वजन कमी करण्याचा गांभिर्याने विचार करणारे, ठरवणारे आपल्या आहारातून काय काय कमी करता येईल याचा हिशोब मांडत बसतात. पण तज्ज्ञ सांगतात, वजन कमी करण्यासाठी आहारातून पदार्थ वजा करण्याची गरज नसते तर आहारात पोषक पदार्थांचा समावेश करुन थोडा बदल करण्याची गरज असते. सकाळच्या , रात्रीच्या जेवणात थोडासा बदल केला तरी वजन कमी करण्याचा हेतू साध्य होतो आणि आरोग्यास पोषणमुल्यंही मिळतात. वजन कमी करण्याचा हेतू पोष्टिक आणि चविष्ट पध्दतीने साध्य करण्यासाठी बेसन पोळी आणि लसणाची चटणी खाल्ल्यास साध्य होतो. बेसन पोळीला मिस्सी रोटी, बेसन रोटी असंही म्हटलं जात्ं. बेसनाच्या पोळीतील गुणधर्मांमुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी , रोगप्रतिकारशकती वाढण्यासाठी बेसन पोळी ही फायदेशीर मानली जाते.
बेसन पोळी आरोग्यदायी कशी?
सहज रीतीने तयार होणारी बेसन पोळी आरोग्याच्या दृष्टीने अनेक कारणांसाठी फायदेशीर मानली जाते.
1. तज्ज्ञ म्हणतात ज्यांच्या रोजच्या आहारात बेसन पिठाचा समावेश असतो त्यांच्या शरीरात फॅटस जास्त साठून राहात नाही. बेसनात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि तांबं या घटकांचा उपयोग वजन नियंत्रित् ठेवण्यासाठी होतो. बेसनाचा आहारात समावेश असल्यास आतड्यांचा अशक्तपणा निघून जातो. यामुळे पचन व्यवस्था नीट काम करते. शरीराला आवश्यक ऊर्जा बेसनपोळीद्वारे मिळते असं आहार तज्ज्ञ सांगतात.
2. बेसन पीठ चवीला चांगलं असून बेसन पिठाच्या पोळीचा उपयोग शरीरास आवश्यक पोषण मिळवून देण्यासाठी होतो. 100 ग्रॅम बेसनात 350 कॅलरीज उष्मांक, प्रथिनं, फॅटस, कर्बोदकं, फायबर , लोह , सोडियम हे घटक शरीरास मिळतात. म्हणूनच बेसन पोळी खाण्याला पोषणाचा पाॅवर डोस असं म्हटलं जातं.
3. बेसन पिठात फायबर आणि प्रथिनांचं प्रमाण जास्त होतं. प्रथिनं आणि फायबर हेच पदार्थ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. प्रथिनं आणि फायबरयुक्त प्रथिनं असलेला आहार घेतला तर वजन कमी होण्यासोबतच हदयाचं आरोग्यही सुरक्षित राहत्ं. बेसन पोळीत असलेलं फायबर हे विरघळणारं असल्यानं त्याचा हदयाच्या आरोग्यासाठी विशेष फायदा होतो.
Image: Google
4. शरीरातील बॅड कोलेस्टेराॅलचं प्रमण कमी करुन नियंत्रित ठेवण्यासाठी बेसन पोळीचा चांगला उपयोग होतो. बेसनात फायबर आणि पाॅलिनसॅच्युरेटेड ॲसिड असतं. या दोन घटकांचा फायदा शरीराला विशेषत: हदयाला मिळतो. बेसन पोळीने कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित राहिल्यने बेसन पोळी म्हणूनच ह्दयाच्या आरोग्यसाठी उपकारक समजली जाते.
5. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यास बेसन पोळी उपयुक्त असते. बेसनात फायबर आणि प्रथिनं या दोन घटकांशिवय फोलेट आणि लोहाचं प्रमाणही जास्त असतं. ॲनेमियात रक्तातील लाल पेशींची संख्या झपाट्याने कमी होते. यामुळे थकवा, अशक्तपणा, श्वास घेण्यात अडचण जाणवते. पण बेसनाच्या पोळीद्वारे शरीरास पुरेसं लोह मिळतं. बेसन पोळीच्या सेवनानं रक्तातील लाल पेशींची संख्या वाढते.
6. बेसन पोळी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. बेसन पोळीतील गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सतत आजारी पडणाऱ्यांनी जर वरचेवर बेसन पोळी खाल्ली तर त्याचा फायदा त्यांच्या रोगप्रतिकार शक्ती वाढण्यावर होतो. बेसन पोळीद्वारे शरीराला जीवनसत्वं, मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि अमिनो ॲसिड असतात. या घटकांमुळे शरीराची जीवाणू, विषाणूवोरोधी लढण्याची ताकद वाढते.
Image: Google
कशी करावी बेसन पोळी?
बेसन पोळी करण्यासाठी 2 कप बेसन, 1 कप गव्हाचं पीठ, मीठ, थोडे निरे, लाल तिखट किंवा बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, आवडत असल्यास 1किसलेला कांदा, चिमूटभर हिंग, आवश्यकतेनुसार पाणी आणि साजूक तूप किंवा तेल घ्यावं.
बेसन पोळी करण्यासाठी एका भांड्यात बेसन पीठ, गव्हाचं पीठ, जिरे, किसलेला कांदा. बारीक चिरलेली हिरवी मिरची/ तिखट, मीठ , हिंग घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून कणिक मळावी. ती मळली गेली की कणकेला तेलाचा हात लावून ती अर्धा तास फ्रिजमध्ये झाकून ठेवावी. 12-20 मिनिटांनी कणिक सेट झाल्यावर त्याच्या लाट्या करुन पोळ्या लाटून घ्याव्यात. नाॅनस्ठिक तव्यावर थोडं साजूक तूप लावून दोन्ही बाजूंनी पोळी शेकून घ्यावी. बेसनाची पोळी केवळ तूप लावून किंवा लोणचं , साखरआंबा यासोबत छान लागतेच. पण लसणाच्या लाल भडक चटणीसोबत पौष्टिक बेसन पोळ्या खाण्यास छान लागतात.
Image: Google
लसणाची चटणी
लसणाची चटणी करताना एक पाऊण वाटी अख्खी लाल मिरची, 1 वाटी लसून पाकळ्या, जिरे, चवीपुरतं मीठ आणि थोडं तेल घ्यावं.
चटणी करताना आधी लाल मिरच्या एका भांड्यात घालून भिजवाव्यात. लसूण सोलून ठेवावा. मग मिक्सरच्या भांड्यात भिजलेल्या लाल मिरच्या बिया काढून , लसूण, थोडा हिंग, चवीपुरत्ं मीठ आणि तेल घ्यावं. गरजेनुसार त्यात थोडं पाणी आणि तेल घालावं. हे सर्व वाटून घ्यावं. एका कढईत थोडं तेल गरम करावं. तेलात जिरे घालावेत. ते तडतडले की मग त्यात् वाटलेलं लसूण मिरचीचं वाटण घालून ते परतून घ्यावं. या सणसणीत चटणीसोबत बेसन पोळी छान लागते.