Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...

Chapati Diet For Quick Weight Loss : Weight Loss Tips Health Chapati Flour Instead Of Wheat Flour To Lose Weight : Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss : Which flour roti is best for weight loss : वजन कमी करण्यासाठी चपाती खाण न सोडता, घरीच तयार करा हे खास पीठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 15:42 IST2025-01-10T15:28:25+5:302025-01-10T15:42:50+5:30

Chapati Diet For Quick Weight Loss : Weight Loss Tips Health Chapati Flour Instead Of Wheat Flour To Lose Weight : Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss : Which flour roti is best for weight loss : वजन कमी करण्यासाठी चपाती खाण न सोडता, घरीच तयार करा हे खास पीठ...

Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss Chapati Diet For Quick Weight Loss | वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...

वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...

सध्याच्या काळात वाढते वजन ही समस्या सगळ्यांनाचं सतावते आहे. वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण डाएट आणि एक्सरसाइजचा आधार घेतात. या दोन मुख्य गोष्टी व्यवस्थित फॉलो केले तर नक्कीच आपल्याला वाढलेले वजन (Weight Loss Tips Health Chapati Flour Instead Of Wheat Flour To Lose Weight) अगदी सहजरित्या कमी करता येऊ शकते. या दोन ठोस उपायांसोबतच इतरही छोटे - मोठे उपाय देखील आजमावून (Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss) पाहिले जातात. यात काहीजण भात, चपाती किंवा अमुक एखादा पदार्थ खाणें सोडून देतात. वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठापासून तयार केली जाणारी चपाती खाणे अनेकजण बंद करतात(Which flour roti is best for weight loss).

गव्हाचे पीठ हे कर्बोदकांनीयुक्त असे असते. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाऐवजी इतर पिठांपासून (How to Choose the Right Atta for Weight Loss for Best Results?) तयार केलेली चपाती आपल्या डाएटमध्ये समावेश करु शकतो. पोळी-भाजी हा आपल्याकडील आहारातला मुख्य घटक आहे. पण मग वजन कमी करण्यासाठी पोळी ( Best Type of Rotis to Boost Weight Loss) ही उपयुक्त नाही म्हणून पोळी खाण्याचं टाळलं तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यापेक्षा आपण रोजच्या जेवणात जी पोळी खातो ती अधिक फायबरयुक्त आणि कमी कॅलरी असलेली कशी असेल याचा विचार करावा. केवळ गव्हाची पोळी खाणं ही त्यातील ग्लुटेन घटकामुळे वजन वाढीसाठी कारणीभूत ठरते. पण पोळी आपल्या आहारातून काढून न टाकता हीच पोळी वेगळ्या प्रकारे करुन वजन (Which Atta is Good For Your Health & Weight Loss?) कमी करता येऊ शकत. 

वेटलॉस करण्यासाठी कोणकोणत्या पिठापासून तयार केलेली चपाती खावी ? 

१. गव्हाचे पीठ - १ कप
२. ज्वारीचे पीठ - १ कप 
३. ओट्स पावडर - १ कप 
४. बेसन - १ कप
५. नाचणीचे पीठ - १ कप 
६. अळशी - १ टेबलस्पून 
७. मेथी पावडर - १ टेबलस्पून 

वजन कमी करण्यासाठी खात राहा ! झटपट वजन उतरवण्याचा अनोखा फंडा, दिसाल स्लिमट्रिम...

वेटलॉससाठीचे हे चपातीचे पीठ कसे तयार करावे ? 

सगळ्यात आधी एक मोठं भांड घेऊन त्यात प्रत्येकी १ कप याप्रमाणे, गहू व ज्वारीचे पीठ घ्यावे. त्यानंतर त्यात ओट्स पावडर, बेसन, नाचणीचे पीठ घालून सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावे. आपले वेटलॉससाठीचे चपातीचे पीठ तयार आहे. हे पीठ तयार करून एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवावे. हे पीठ मळताना त्यात आपण आपल्या आवडीनुसार प्रत्येकी १ टेबलस्पून अळशीच्या बिया किंवा त्याची पावडर अथवा मेथी दाण्यांची पावडर या दोघांपैकी कोणताही एक पदार्थ घालू शकता. वजन कमी करण्यासाठी या पिठापासून तयार केलेल्या चपात्या खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल. 

सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

वजन कमी करण्यासाठी हे पीठ कसे फायदेशीर? 

१. ज्वारी :- ज्वारीच्या पिठामुळे वजन कमी होतं. ज्वारीचं पीठ ग्लूटेन फ्री तर असतंच सोबतच त्यात पचनाला मदत करणारे फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, ब आणि क जीवनसत्त्वं असतात. जे शरीरातून टॉक्सिक घटक काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे या पिठाची पोळी खाल्ल्याने वजन तर कमी होतंच सोबतच ज्वारीतल्या गुणधर्मामुळे पचन क्रिया सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित रहाते.     

२. ओट्स पावडर :- ओटस हे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अनेक पोषकतत्वे असतात. यामुळे वजन आणि मधुमेह हे दोन्ही नियंत्रणात राहते. 

३. नाचणी  :- नाचणी लोह, कॅल्शियम आणि फायबरचा मुख्य स्त्रोत आहे, जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. जर, आपल्याला वजन कमी करायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. कारण नाचणी आपली भूक नियंत्रित करण्याबरोबरच बर्‍याच काळासाठी पोट भरलेले राहते. नाचणी सहज पचते आणि रोजच्या आहारात घेण्यास पौष्टिकही असते.    

४. बेसन :- बेसनमध्ये फायबर आणि प्रोटिनचे प्रमाण जास्त असते. याचबरोबर ते पचनक्रिया सुधारते. बेसन खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि ब्लड शुक्ल नियंत्रित राहते.

Web Title: Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss Chapati Diet For Quick Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.