Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कशी कमी करावी हा प्रश्न पडला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा...(best bedtime drink to lose belly fat)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2024 05:43 PM2024-12-10T17:43:03+5:302024-12-10T19:12:10+5:30

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कशी कमी करावी हा प्रश्न पडला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेचच करून पाहा...(best bedtime drink to lose belly fat)

best bedtime drink to lose belly fat, expert suggest best home remedy to reduce tummy, how to control weight | रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' पाणी प्या, पोटावरची चरबी घटेल- १५ दिवसांत फरक दिसेल

Highlights३० ते ५० या वयातल्या महिलांनी हमखास हा उपाय करायलाच हवा, असं आहारतज्ज्ञ सुचवतात.

बऱ्याच लोकांच्या आणि विशेषत: महिलांच्या बाबतीत आपण असं पाहातो की त्यांची तब्येत तर प्रमाणात असते, पण पोट मात्र सुटलेलं असतं. हात- पाय बारीक असतात. पण पोटाचा आकार मात्र वाढलेला असतो. पहिल्या बाळंतपणानंतर बऱ्याच महिलांना हा त्रास होतो. यासाठी बाळंतपणामध्ये शरीरात होणारे काही बदल कारणीभूत असतातच. पण त्यासोबतच चुकीची आहारपद्धती, व्यायामाचा अभाव, पचनक्रिया आणि चयापचय क्रिया यांच्यात काहीतरी बिघडणे किंवा हार्मोन्सचे असंतुलन ही कारणंही त्यासाठी जबाबदार असतात (expert suggest best home remedy to reduce tummy). त्यामुळेच पोटाचा घेर कमी करण्यासाठी त्यांनी रोज रात्री झोपण्यापुर्वी एक खास उपाय करणं गरजेचं आहे (how to control weight?), असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत.(best bedtime drink to lose belly fat)

 

पोटावरची चरबी कमी करण्याचा सोपा उपाय

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणता उपाय करायला पाहिजे, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी balancenutrition.in या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

अपर लिप्स करण्यासाठी घरच्याघरी 'या' पद्धतीने तयार करा व्हॅक्स, फेशियल हेअर काढण्याचा सोपा उपाय

यामध्ये त्या सांगतात की एका पातेल्यामध्ये ५०० ते ६०० मिली पाणी घ्या. त्या पाण्यातच ओवा आणि बडिशेप हे एकत्रित मिळून एक चमचा टाका. 

त्यासोबतच त्यात अर्धा चमचा हळद आणि १ चमचा धणे टाका.

वरील सगळे पदार्थ टाकलेले पाणी गॅसवर उकळायला ठेवा. ३ ते ४ मिनिटे पाणी खळखळ उकळू द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा. पातेल्यावर झाकण ठेवा आणि १५ मिनिटांनी हा काढा प्या.

 

हा काढा जर तुम्ही नियमितपणे प्यायलात तर चयापचय क्रिया, पचनक्रिया उत्तम होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.

शिवाय शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास निश्चितच मदत होईल. अगदी १५ दिवसांत तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

मानेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत.. कोणतेही जॉईंट दुखायला लागल्यास 'ही' मुद्रा करा, सांधेदुखी कमी होईल 

याव्यतिरिक्तही हा काढा पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये आपण बडिशेप, ओवा, हळद, धणे हे जे पदार्थ वापरतो आहोत त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढून ॲनिमियाचा त्रास कमी होण्यासही मदत होते. शिवाय केस गळण्याचा त्रासही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यामुळे ३० ते ५० या वयातल्या महिलांनी हमखास हा उपाय करायलाच हवा, असं आहारतज्ज्ञ सुचवतात.


 

Web Title: best bedtime drink to lose belly fat, expert suggest best home remedy to reduce tummy, how to control weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.