निरोगी राहण्यासाठी नाश्ता महत्वाचा. जर सकाळी हेल्दी पदार्थ खाल्ले तर, वेट लॉस होईलच (Breakfast for Weight loss). शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे मिळू शकतात (Fitness). वजन कमी करणं हा उद्देश असेल तर तज्ज्ञ म्हणतात की सकाळचा नाश्ता हा टाळायचा नाही तर करायचाच (Healthy Breakfast). काही जण वजन कमी होत नाही म्हणून, नाश्ता टाळतात. पण नाश्ता टाळल्याने वजन अधिक वाढू शकते (Health Care).
सकाळच्या योग्य नाश्त्यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागत नाही. कामासाठी ऊर्जा मिळते. शिवाय कामातही लक्ष लागतं. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, ५ प्रकारचे हेल्दी आणि टेस्ट पदार्थ खा. यामुळे वेट लॉस होईल. शिवाय आरोग्यही सुदृढ राहील(Best Breakfast Foods for Weight Loss - check out list).
वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?
इडली
आपल्या दिवसाची सुरुवात नेहमी कोमट पाण्याने करावे. यामुळे चयापचय क्रिया बुस्ट होते. नंतर दही खा. यामुळे शरीराला प्रोबायोटिक मिळेल. नंतर आपण नाश्त्याला इडली खाऊ शकता. उडीदाची डाळ हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय तांदळातून कार्बोहायड्रेट्सही मिळतात. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. यामुळे पचनक्रियाही सुधारते, व शरीरात अतिरिक्त चरबीही वाढत नाही.
पानं सतत पिवळी? रोपांना फळं - फुलंच येत नाही? उरलेल्या चहापत्तीचा करा ' असा ' करा उपयोग'; झाड बहरेल
पोहे
महाराष्ट्रीयन घरांमध्ये पोहे असतेच. जे चवदार तसेच पौष्टीक अन्न मानले जाते. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदाच होतो. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते शिवाय पचनक्रिया सुधारणे, वजन कमी करण्यास मदत, रोगप्रतिकारशक्ती यासह दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यास मदत करते.
ओट्स
ओट्स खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. त्यात जीवनसत्त्वे, फायबर, खनिजे, प्रथिने असते. जर वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर ओट्स हा उत्तम पर्याय आहे. ओट्स मध्ये कॅलरीचं प्रमाण चांगलं असतं. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ओट्स हा उत्तम डाएट आहे.
ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..
मूग डाळ डोसा
वजन कमी करण्यासाठी मूग डाळ खूप फायदेशीर मानली जाते. मूग डाळीत प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे स्नायूंच्या विकासात मदत करतात. यात फायबरचेही प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.