हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) आणि हाय ब्लड शुगर (High Blood Sugar) या दोन्ही आजारांना सायलेंट किलर समजले जाते. या दोन्ही स्थितीत सुरूवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाही. प्रकृती गंभीर झाल्यानंतर शरीरात बदल होतात. म्हणून काही वॉर्निंग साईन्सकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. (Best breakfast for diabetes and high blood pressure) तुमचा आहार कसा आहे. यावर ठरतं की ब्लड प्रेशर आणि शुगर कशी मेंटेन राहील. एक्सपर्ट्स आणि डॉक्टर शुगर आणि बीपीच्या रुग्णांना फिजिकली एक्टिव्ह राहण्याबरोबरच हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देतात. नाश्त्याला कोणते पदार्थ खाल्ल्यानं बीपी, शुगर कंट्रोलमध्ये राहते ते पाहूया. डॉ. राजेश पाधी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (What food is good for high blood pressure and diabetes)
हाय फायबर्सयुक्त पदार्थ
आपल्या नाश्त्यामध्ये हाय फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. म्हणजे ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असेल आणि सिरप किंवा स्विटनरचा वापर केला नसेल. प्रत्येक सर्विंगमध्ये कमीत कमी ३ ग्राम फायबर्स मिळायला हवेत. गाईचे दूध किंवा बदामाच्या दूधाचा आहारात समावेश असावा. (What to Eat for Breakfast When You Have Diabetes)
कुणाला हार्ट अटॅक आला, तर अशावेळी अवतीभोवतीच्या माणसांनी चटकन काय करायला हवं?
दलिया
दलिया हे पौष्टीक पदार्थांपैकी एक आहे. कमी दूध आणि कमी फॅट्सयुक्त पदार्थांपासून हे तयार केले जाते. यात ताजी फळं, जसं की जांभूळ किंवा कापलेले केळी घालून नैसर्गिकरित्या याची चव वाढवता येते. गोडवा येण्यासाठी तुम्ही यात दालचीनी मिसळू शकता.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्ट नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कमी गोड असलेल्या दह्याची निवड करा. यात चवीसाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स मिसळू शकता. याशिवाय एक चमचा मध आणि एक चिमूट दालचीनीसुद्धा घालू शकता.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे १० पदार्थ; रोज खा, निरोगी राहा-हार्ट सांभाळा
मल्टीग्रेन ब्रेड
पांढऱ्या ब्रेडऐवजी मल्टीग्रेन ब्रेडचे सेवन करा. प्रत्येक स्लाईसमध्ये कमीत कमी ३ ग्राम फायबर्स असात. हेल्दी फॅट्ससाठी तुम्ही यात एवोकॅडो, कापलेले टोमॅटो आणि काही वनस्पती घालू शकता. याशिवाय ताजी फळं आणि भाज्या, हर्बल चहाचे सेवन करा. भरपूर पाणी प्या.
पोहे
पोहे हा कमी कॅलरीजयुक्त नाश्ता आहे. डायबिटीस, बीपी कसलाही त्रास असल्यास पोह्याचे सेवन उत्तम ठरते. पोह्यांमध्ये तुम्ही आवडीनुसार शेंगदाणे किंवा बटाटे घालू शकता.
मूग डाळीचा डोसा
मूग डाळ पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. याशिवाय ही डाळ लो कॅलरी फूड आहे. नाश्त्याला मूग डाळीचा डोसा हा उत्तम पर्याय आहे. हा डोसा बनवण्यासाठी तेल कमी लागते आणि यामुुळे वजनही नियंत्रणात राहते.