Join us  

कोलेस्टेरॉल वाढण्याचं टेंशन विसरा, नाश्त्याला खा ३ पदार्थ- दिल-दिमाग तंदुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 5:54 PM

Breakfast Options That Controls Cholesterol: काही जणांच्या बाबतीत हा त्रास नेहमीच जाणवतो. कोलेस्टरॉल सतत वाढत (high cholesterol) असेल तर रोजच्या नाश्त्यामध्ये अशा पद्धतीने थोडा बदल करा...

ठळक मुद्देकोलेस्टरॉलचा त्रास असेल किंवा तुमच्या घरी हार्ट पेशंंट असतील, तर त्यांना नाश्त्यासाठी हे काही पदार्थ देऊन बघा. वजन तर नियंत्रणात राहीलच पण कोलेस्टरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरेल. 

आजकाल वयस्कर व्यक्तींनाच नाही तर अगदी तिशी- पस्तिशीतल्या तरुणांनाही कोलेस्टरॉलचा (how to control high cholesterol) त्रास जाणवतो आहे. अर्थात यासाठी आहाराच्या चुकीच्या पद्धती, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव या सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. यामुळे मग शरीरातील कोलेस्टरॉल वाढते आणि कमी वयातच हृदय विकाराचा त्रास सुरु होतो. सतत कोलेस्टरॉल वाढत असेल तर डॉक्टराच्या सल्ल्याने योग्य गोळ्या- औषधी घेणं कधीही उत्तम. पण तरीही याला पुरक म्हणून तुम्ही घरच्याघरी आहारात काही बदल निश्चितच करू शकता. (perfect breakfast for heart patients)

 

नाश्ता हेवी करायचा हे आपल्याला ठाऊक असतं. पण हेवी नाश्ता करण्याच्या नादात आपण पोटावर आणि आपल्या तब्येतीवर अन्याय तर करत नाही ना, हे एकदा तपासून बघायला हवं. नाश्त्यामध्ये चुकीचे पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ले तरी त्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो.      फक्त ३ सवयी बदलल्या तर वजन वाढणारच नाही, आणि वाढलेलं वजनही होईल लवकर कमी

कोलेस्टरॉल वाढू शकतं. म्हणूनच जर कोलेस्टरॉलचा त्रास असेल किंवा तुमच्या घरी हार्ट पेशंंट असतील, तर त्यांना नाश्त्यासाठी हे काही पदार्थ देऊन बघा. वजन तर नियंत्रणात राहीलच पण कोलेस्टरॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरेल. 

 

कोलेस्टरॉल कंट्रोल करण्यासाठी नाश्त्यात घ्या हे ३ पर्याय१. सफरचंद आणि सुकामेवाबऱ्याचदा नाश्ता तयार करण्यासाठी कमी वेळ असला की ब्रेड, मॅगी, बिस्किटे किंवा मग बाहेर मिळणारा वडापाव, सॅण्डविज असं काहीतरी घाईघाईने खाऊन वेळ मारून नेली जाते. पण हे सगळे पदार्थ हृदयासाठी अजिबातच चांगले नाहीत. त्यामुळे जेव्हा खूप गडबड असेल, नाश्ता तयार करायला वेळच नसेल तेव्हा एखादं सफरचंद आणि त्यासोबत बदाम, अक्रोड, मनुका असा सुकामेवा खा. अशा पद्धतीच्या नाश्त्यातून भरपूर प्रमाणात सोल्यूबल फायबर, हेल्दी फॅट्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळेल. हा नाश्ता करून पोट तर भरून जाईलच पण भरपूर एनर्जीही मिळेल. 

 

२. ब्रोकोली सलाडब्रोकोली हे हृदयासाठी अतिशय चांगलं आहे. ब्रोकोलीला व्हिटॅमिन्स आणि खनिजांचं पॉवरहाऊस मानलं जातं. शिवाय त्यात भरपूर प्रमाणात फायबरही असतं. त्यामुळे असा नाश्ता आठवड्यातून एकदा तरी कराच. ब्रोकोली सलाड म्हणजे फक्त ब्रोकोलीच खायचं असं नाही.  

भात आवडतो? बिंधास्त खा, पण त्यासोबत भाज्या आणि सलाड किती खायचं? हे घ्या प्रमाण

हे सलाड करताना त्यात वेगवेगळ्या भाज्या, कांदा, टोमॅटो, उकडलेले स्वीटकॉर्न, पुदिना, चाट मसाला असं सगळं टाका. हवं तर चवीसाठी त्यात एक- दोन चमचे दही टाका. आणखी चांगला स्वाद येईल. सगळ्या कच्च्या भाज्या कोलेस्टरॉल कमी करण्यास अतिशय उपयुक्त ठरतात. याशिवाय शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यासाठीही कच्च्या भाज्या मदत करतात.  

 

३. वेगन मिल्क स्मुदीहा एक अतिशय झटपट होणारा आणि चवदार नाश्ता होऊ शकतो. तसंच तो तुमच्या हृदयाची आणि तब्येतीचीही पुरेपूर काळजी घेतो. यासाठी एखादं केळ, बेरी प्रकारातलं फळ, सुकामेवा आणि अर्धा कप वेगन मिल्क एकत्र करा आणि मिक्सरमधून फिरवून त्याची मस्त स्मुदी करा. बेरी प्रकारच्या फळांमुळे ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतील, कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होईल, तसेच केळीमुळे एनर्जी भरपूर वेळ टिकून राहण्यास मदत होईल. शिवाय वेगन मिल्कच्या माध्यमातून प्रोटीन्स, macro and micronutrient मिळतील.  

टॅग्स :फिटनेस टिप्सअन्नहेल्थ टिप्सहृदयरोग