नवरात्रीत अनेक भाविक नऊ दिवस उपवास (fast in navratri) करतात. आपल्या घरातल्या प्रथा- परंपरेनुसार उपवास कसा करायच्या, याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. पण अनेक जणांचे उपवास हे नवरात्रीच्या शेवटच्या माळेला म्हणजेच नवमीला सुटतात. तोपर्यंत फळं आणि उपवासाचे पदार्थच खाल्ले जातात. सुरुवातीला उत्साह असतो. पण नंतर नंतर मात्र हे नऊ दिवसांचे उपवास त्रासदायक ठरू लागतात. शक्ती कमी होत जाते. त्यातही वर्किंग वुमन असेल तर तिला घरातले, ऑफिसमधले कामं सांभाळून हे उपवास (diwt plan for navratri) करणं खूपच अवघड होऊ लागतं. म्हणूनच सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी नवरात्रीचे उपवास कसे असावेत, याविषयीची एक पाेस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून ती चांगलीच व्हायरल झाली आहे.
नवरात्रीचे उपवास करताना कसा असावा दिवसभराचा आहार?हे उपवास करताना दिवसातून ४ ते ५ वेळा थोडं थोडं खाल्लं पाहिजे, तसंच प्रत्येकवेळी आहारातही बदल झाला पाहिजे. जेणेकरून शरीराला संपूर्ण पोषण मिळेल, असं ऋजुता यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.१. सकाळी उठल्यानंतरसकाळी उठल्यानंतर चहा- कॉफी- दूध हे आपलं रोजचं रुटीन झालं की त्यानंतर एखादं ताजं फळं किंवा मुठभर सुकामेवा किंवा भिजवलेल्या मनुका त्या पाण्यासकट प्या तसेच त्यात थोडं केशरही टाका.
२. नाश्ता नाश्त्याला शिंगाड्याच्या पिठाचे थालिपीट किंवा वडे, साबुदाणा खिचडी, रताळ्याच्या फोडी, बटाट्याची खीर असे पदार्थ घेऊ शकता.
३. दुपारचे जेवणदुपारच्या जेवणात राजगिऱ्याचे थालिपीट किंवा उपवासाच्या भाजणीच्या पिठाचे थालिपीट, मखाना भाजी, मखाना खीर यांच्यापैकी काही पदार्थ घ्यावेत.
४. स्नॅक्स टाईमदुपारचं जेवण ते रात्रीचं जेवण या मधल्या वेळेत ताक, लस्सी, दही, लिंबू किंवा वेगवेगळी सरबते, शिकंजी, एखादी खीर यापैकी काहीतरी खावे.
५. रात्रीचं जेवण राजगिरा किंवा शिंगाड्याची पोळी आणि त्यासोबत बटाट्याची, रताळ्याची भाजी असा आहार घ्यावा.