Join us  

पोट-कंबर-मांड्या सुटल्यात, कपडे घट्ट होतात? पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून प्या; भराभर वितळेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 11:21 AM

Best Homemade Drink For Weight Loss : तुमचं पोट खूपच बाहेर आलं असेल तर खाणंपिणं आणि रूटीनकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे.

पोटाची चरबी (Belly Fat) कमी करणं हा एक मोठा टास्क बनला आहे. पोटाची चरबी कमी होता होत नाही. लटकलेल्या पोटामुळे तुमचा लूक खराब होत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. बेली फॅट वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. (Belly Fat) जसं की हॉर्मोनल इंम्बॅलेंस, स्ट्रेस, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. जर तुमचं पोट खूपच बाहेर आलं असेल तर खाणंपिणं आणि रूटीनकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. (Jamun Fennel Coriander Methi Seeds Powder For Belly Fat)

पोट कमी करण्यासाठी तुम्ही पाण्यात काही वस्तू मिसळून प्यायला हव्यात. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. डायटिशियन मनप्रीत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्या दिल्ली युनिव्हर्सिटीच्या न्युट्रिशनिस्ट असून त्यांनी त्यात मास्टर्स केले आहे. (Jamun Fennel Coriander Methi Seeds Powder For Belly Fat)

रिसर्चनुसार बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही जांभूळाच्या बीया, चिया सिड्स, बडिशेपेच्या बीया, धण्यांच्या बीया आणि मेथीच्या बियांची पावडर वापरू शकता ही पावडर पाण्यात मिसळून प्या. बडीशेपेच्या बीया, इंसुलिन रेजिस्टंस कमी करतात आणि मेटाबॉलिझ्म वाढतो. (Ref) ज्यामुळे बेली फॅट बर्न होते आणि संपर्ण शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.  जांभूळाच्या बीयांच्या पावडरचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात.

ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. धण्यांमध्ये असे कंम्पाऊंड असतात  जे लिपिड मेटाबॉलिझ्म कमी करून पोटावर जमा झालेली चरबी वितळवतात. यामुळे पचनाशी निगडीत समस्या कमी होतात आणि वजनही कमी होते. मेथीच्या बीयांमध्ये फॅट बर्निंग गुण असतात. ज्याच्या सेवनाने वजनही नियंत्रणात राहते आणि शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये येते. 

बेली फॅट बर्नर ड्रिंक घरी कसं बनवायचं? (How To make Fat burner drink At Home)

जांभळाच्या बीयांची पावडर - २ टेबलस्पून

बडिशेपेच्या बियांची पावडर- ४ टेबलस्पून

धण्याची पावडर - ४ टेबलस्पून

मेथीच्या बियांची पावडर - ४ टेबलस्पून

पाणी - २०० मिलीलिटर

वरील साहित्य एकत्र करून एका डब्यात भरून ठेवा. आता १ ग्लास पाण्यात १ टिस्पून पावडर मिसळून व्यवस्थित एकजीव करा. ज्यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे चारही पदार्थ मिसळून ग्लासभर पाण्यात रोज प्या. त्याचबरोबरच डाएट, व्यायामाकडे पुरेपूर लक्ष द्या. आरोग्याशी संबंधित समस्या असतील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे उपाय करा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स