वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करणं गरजेचं असतं. (Weight Loss Tips) जितक्या कॅलरीज तुम्ही खाता त्यापेक्षा जास्त कॅलरीज वजन कमी करण्यासाठी बर्न कराव्या लागतात. नवीन वर्षात जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर इफेक्टिव्ह डाएट फॉलो करू शकता. (Fitness Tips) पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे डाएट फॉलो केल्यास तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. ७ दिवस या डाएटनुसार आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर वजन कमी करणं सहज सोपं होऊ शकतं (Tips For Healthy Weight Loss in The New Year)
रोज १ तास वॉक आणि ३० मिनिटांचा व्यायाम तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आहारतज्ज्ञ इतू छाबडा यांनी पोट कमी करण्यासाठी साधा, सोपा डाएट प्लॅन सांगितला आहे. (Top Tips for New Year Weight Loss) एकावेळी खूप वजन कमी करणं कठीण आहे. म्हणून वजन कमी करण्यासाठी आधी डोकं व्यवस्थित सेट करा त्यानंतर प्लॅन तयार करा. दर आठवड्याला आणि दर महिन्याला किती वजन कमी करायचं आहे ते ठरवून घ्या. (Easy Tips To Keep Weight Loss as a New Year Resolution)
१) सकाळी उठल्यानंतर - बडीशेप किंवा मेथीचे पाणी
रात्रभर पाण्यात भिजवलेली मेथी आणि बडीशेपेचं पाणी प्या. सकाळी गाळून हे पाणी प्या. सकाळी गरम पाण्यात लिंबू घालून तुम्ही पिऊ शकता. यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहण्यास मदत होईल.
गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल
२) नाश्ता- मूग डाळीचा चिला
नाश्ता हा प्रोटीन्सयुक्त असायला हवा. नाश्त्यााला मूंग डाळीचा चिला खा. याव्यतिरिक्त तुम्ही दुधीचा डोसाही खाऊ शकता. २ किंवा ३ इडल्या आणि १ कप सांबारचे सेवन करा.
३) दुपारचे जेवण- ओट्सची चपाती, भाजी आणि सॅलेड
आपल्या आहारात ओट्सपासून तयार केलेली चपाती, १ कप भाजी आणि सॅलेडचा समावेश करा. दुपारच्या जेवणात अर्धा कप दह्याचा समावेश करा.
वजन घटवण्यासाठी पाणी कसं प्यायचं? पाहा आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत-मेंटेन राहाल
४) रात्रीचे जेवण- १ चपाती, मिक्स भाजी, दही
रात्रीचे जेवण जास्तीत जास्त ७ किंवा ८ वाजता करा. चपातीऐवजी भाकरी खा, भाज्या किंवा दह्याचा आहारात समावेश करा. याव्यतिरिक्त १ कप क्विनोआ आणि डाळ, एक कप सॅलेड खा.