Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रोटिन्सचा खजिना असलेले ५ व्हेज पदार्थ; कमी पैशात प्रोटीन वाढवा, साइड इफेक्ट्सही नाहीत

प्रोटिन्सचा खजिना असलेले ५ व्हेज पदार्थ; कमी पैशात प्रोटीन वाढवा, साइड इफेक्ट्सही नाहीत

Best Protein Sources for Vegans and Vegetarians : प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो, प्रोटिन्सयुक्त पदार्थ महाग असतात, फक्त नॉनव्हेज खाल्ल्यानेच प्रोटीन्स मिळतात असे बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:45 PM2023-08-03T12:45:52+5:302023-08-03T13:43:28+5:30

Best Protein Sources for Vegans and Vegetarians : प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो, प्रोटिन्सयुक्त पदार्थ महाग असतात, फक्त नॉनव्हेज खाल्ल्यानेच प्रोटीन्स मिळतात असे बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात.

Best Protein Sources for Vegans and Vegetarians : List of Protein Rich Food For Vegetarians | प्रोटिन्सचा खजिना असलेले ५ व्हेज पदार्थ; कमी पैशात प्रोटीन वाढवा, साइड इफेक्ट्सही नाहीत

प्रोटिन्सचा खजिना असलेले ५ व्हेज पदार्थ; कमी पैशात प्रोटीन वाढवा, साइड इफेक्ट्सही नाहीत

शरीराला प्रोटिन्सची आवश्यकता का असते, प्रोटिन्स का खायचे, असे  प्रश्न अनेकांच्या मनात असतात. (Top Vegetarian Protein Sources) प्रोटिन्स युक्त पदार्थांच्या सेवनानं तब्येतीवर चांगला परिणाम होतो. कारण यात असलेले पोषण घटक शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आणि विकासासाठी फायदेशीर ठरतात. (Protein Foods) प्रोटिन्ससाठी खूप खर्च लागतो, प्रोटिन्सयुक्त पदार्थ महाग असतात, फक्त नॉनव्हेज खाल्ल्यानेच प्रोटीन्स मिळतात असे बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात. (List of Protein Rich Food For Vegetarians) प्रोटिन्सची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात काही व्हेज पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे कमी खर्चात तुम्हाला भरभरून प्रोटीन्स मिळतील. (The best sources of protein for vegetarians)

ग्रीक योगर्ट 

ग्रीक योगर्ट हा एक दह्याचाच एक प्रकार आहे. हे एक टेस्टी आणि पोषक तत्वांनी परीपूर्ण असते. बाजारात हे सहज उपलब्ध होते.  साध्या दह्याऐवजी तुम्ही या दह्याचा आहारात समावेश करू शकता.  चव वाढवण्यासाठी त्यात मीठ, अखरोट आणि मध मिसळून खा.

दूध

दुधात फक्त कॅल्शियमच नाही तर प्रथिने भरपूर असतात. दूध हा उच्च दर्जाच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. याशिवाय एक ग्लास दुधाला संध्याकाळचा परफेक्ट ब्रेकफास्ट म्हणता येईल, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते.

ड्रायफ्रुट्स

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अक्रोड, बदाम आणि पिस्ता यांसारखे काही ड्राय फ्रूट्स सर्वोत्तम मानले जाऊ शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ते हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. पण ड्रायफ्रुट्समध्ये जास्त कॅलरीज असतात. त्याचे मर्यादीत प्रमाणात सेवन करा.

डाळी

डाळी हा शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सुप्रसिद्ध स्त्रोत आहेत. केवळ प्रथिनेच नाही तर डाळींमध्ये फायबर, फोलेट, मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि बी जीवनसत्त्वे यांसारखी पोषक तत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. डाळींमधील प्रथिने हृदयाचे आरोग्य राखण्यास, पचनास मदत करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

बटाटा

बटाट्याला बर्‍याचदा फॅट्युक्त पदार्थ म्हणून दुर्लक्षित केले जाते. पण बटाटा प्रथिने आणि इतर पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. एक मॅश केलेला बटाटा प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स सारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांनी समृद्ध असतो. जेव्हा तुम्ही बटाटा खाता तेव्हा संयम आवश्यक असतो, कारण त्यात कॅलरीज खूप जास्त असतात.

Web Title: Best Protein Sources for Vegans and Vegetarians : List of Protein Rich Food For Vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.