सकाळचा नाश्ता दिवसाचं पहले अन्न असते. जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं फार महत्वाचं असतं. (The best time to eat breakfast) नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येणं- अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही. कामात मनही लागत नाही. सकाळच्यावेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासूनही बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी. (Best time for breakfast)
तज्ज्ञांच्यामते सकाळी ७ ते ८ दरम्यान नाश्ता करण्याचा सगळ्यात योग्यवेळ असते. जर या वेळेत नाश्ता करू शकत नसाल तर सकाळी १० च्या आत नाश्ता करा. (The right time to have breakfast) कारण रात्रभर उपाशी राहिल्यामुळे सकाळी शरीराला एनर्जीची आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजचा स्तर कमी असतो. नाश्ता केल्यानं शरीराला पुरेपूर एनर्जी मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते. (What Is The Best Time To Eat Breakfast)
उठायला उशीर झाला तर नाश्ता कधी करावा?
सकाळी जर तुम्ही उशीरा उठलात तर उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करायला हवा. सकाळी वेळेवर नाश्ता केल्यानं डायबिटीस, बीपीचे त्रास उद्भवत नाहीत. जर तुम्ही वेळेवर नाश्ता करत नसाल वजन वाढू शकतं कारण नाश्ता स्किप केल्यामुळे तुम्हाला इतर पदार्थ खाण्याचे क्रेव्हिग्स होतात. अशावेळी तुम्ही जास्त खाऊ शकता ज्यामुळे वजन वाढू शकतं.
दातांवर पिवळा थर आलाय? फक्त २० रूपयांत पांढरेशुभ्र, चमकदार होतील दात, करा २ उपाय
नाश्त्यासाठी कोणते पदार्थ उत्तम
1) ओट्स- ओट्स हा एक हेल्दी आणि पौष्टीक नाश्ता आहे. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. ओट्स दूध, दही किंवा पाण्यासह तुम्ही खाऊ शकता.
2) दलिया- दलिया ओट्सप्रमाणे एक पौष्टीक पदार्थ आहे. दलिया खिचडी किंवा दलिया उपमाचा तुम्ही नाश्त्याला समावेश करू शकता.
3) फळं आणि दही- फळं आणि दही एक स्वादीष्ट, पौष्टीक कॉम्बिनेशन आहे. दह्यातून तुम्हाला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. ज्यामुळे स्नायू चांगले राहतात.
4) पोहे- पोहे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर्स मिळतात. पोहे खाल्ल्यानंतर जवळपास ३ ते ४ तास तुम्हाला भूक लागणार नाही.