Join us  

ओटी पोट सुटलंय, मांड्या पसरट दिसतात? रोज 'या' वेळेत मूठभर मखाणे खा, भराभर घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:29 AM

Best Time To Eat Makhana For Weight Loss : जवळपास  ५० ग्राम मखाने खाल्ल्याने तुम्हाला १८० कॅलरीज मिळतात.

जेव्हा वजन कमी करण्याकडे लक्ष दिले जाते. तेव्हा तुम्ही किती खाता, कोणत्यावेळी खाता याकडे लक्ष देणं फार महत्वाचे असते. ( How to Eat Makhana For Weight Loss) खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये पथ्य पाळली तर तुम्ही कमीत कमी वेळेत वजन कमी करू शकता. पण जर  खाण्यावर कंट्रोल नसेल तर वजन कमी करणं तुमच्यासाठी कठीण होऊ  शकतं. जवळपास  ५० ग्राम मखाने खाल्ल्याने तुम्हाला १८० कॅलरीज मिळतात. (Best Time To  Eat Makhana For Weight Loss)

हेल्दीफाय मी च्या रिपोर्टनुसार मखान्यांच्या एका  सर्विंगमध्य जवळपास  ३४७ कॅलरीज,  ९.७ ग्रॅम प्रोटीन, ०.१ ग्रॅम फॅट्स आणि ७६.९ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, १४.५ ग्रॅम फायबर्स तर ६९ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. वजन कमी करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो ,अशावेळी तुम्ही आहारात मखान्यांचा समावेश केल्यास वजन घटवणं सोपं होऊ शकतं.  मखान्यांमध्ये सोडियम किंवा सॅच्युरेडेट फॅट्स नसते. मखाने वजन कमी करण्यासाठी एक उत्तम स्नॅक्स आहे. कोणत्यावेळी मखाने खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे मिळतात आणि वजन कमी करण्यास मदत होते ते पाहूया.

वजन कमी करण्यासाठी मखाने कितपत फायदेशीर?

मखान्यांमध्ये एंटी एजिंग आणि एंटी इंफ्लेमटरी गुण असतात.  मखाने हे ग्लुटेन फ्री असतात. यात मॅग्नेशियमचे प्रमाण  जास्त असते तसेच यात आयर्नही असते ज्याचा ग्यायसेमिक इंडेक्सही कमी असतो. मखाने खाल्ल्याने फक्त पचनक्रिया चांगली राहत नाही तर शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते आणि मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो.

मखान्यांमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण चांगले असते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. मखाने  फायबर्सचा चांगला स्त्रोत आहेत. डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

कितीपण खा वजनच वाढत नाही-हडकुळे दिसता? रामदेव बाबा सांगतात १ उपाय, भरपूर ताकद येईल

मखाने खाण्याची योग्यवेळ कोणती? (What Is Right Time To  Eat Makhana)

मखाने खाण्याची योग्यवेळ मीड मॉर्निंग किंवा संध्याकाळची वेळ आहे. यावेळी स्नॅक्सप्रमाणे तुम्ही मखाने खाऊ शकता.  एक कप ग्रीन टी किंवा दुधाचा चहासुद्धा उत्तम पर्याय आहे. मखाने हलके भाजा त्यात मीठ, मसाला  आवडीनुसार घालू शकता. एक वाटी भाजलेले मखाने रोज खाल्ल्याने तुम्हाला वजनात फरक दिसून येईल.

मखाने खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात?

मखाने खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यात प्रोटीन्स, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लिव्हर डिटॉक्सिफाय होते मखाने खाल्ल्याने लिव्हरचे आरोग्यही चांगले राहते. 

ऊन्हाळ्यात १ ग्लास ऊसाचा रस प्यायल्याने मिळतील भन्नाट फायदे; इम्यूनिटी वाढेल- फिट राहाल

मखाने खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. मखाने एक लो फॅट फूड असून ज्यामुळे ब्लड प्रेशर मॅनेज करणं सोपं होतं. डायबिटीसच्या रुग्णांनी आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करावा. मखान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे शुगर लेव्हल कमी करणं सोपं होतं. मखान्यांमध्ये एंटी एजिंग गुण असतात. ज्यामुळे शरीर वेळेआधीच म्हातारे होत नाही. ग्लुटेन फ्री असल्यामुळे मखान्यांचा तुम्ही आपल्या ग्लुटेन फ्री डाएटमध्ये समावेश करू शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स