वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. पण तोंडावर नियंत्रण नसल्यानं बरेच पदार्थ खाण्यात येतात आणि वजन जास्तच वाढत जातं. (Weight Loss Tips) याशिवाय तुमची जीवनशैली, पाणी पिण्याचं टायमिंगही तितकंच महत्वाचं असतं. वजन वाढणं हा काही आजार नाही पण यामुळे कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोरोनरी आर्टरी डिसीज, ट्रिपल वेसल डिसीज आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. (Best way to drink water for weight loss)
तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की पाणी पिऊनही तुम्ही वाढते वजन कमी करू शकता. आपले बहुतेक शरीर पाण्याने बनलेले असते आणि त्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. बहुतेक आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. ठराविक पद्धतीने पाणी प्यायल्यास लठ्ठपणा कमी होतो. (4 Ways to Lose Weight With Water)
१) गरम पाणी प्या
चांगल्या पचनासाठी आणि मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी सकाळी गरम पाणी प्यायला हवं. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. याशिवाय हळूहळून वजनही कमी होऊ लागतं. पण व्यायामानंतर गरम पाणी पिणं टाळा. व्यायामनंतर साधं किंवा थंड पाणी प्या.
२) पोटाची आणि कंबरेची चरबी होईल कमी
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला तेलकट आणि चरबीयुक्त पदार्थांपासून दूर राहावे लागेल, त्याचप्रमाणे तुम्ही नियमित गरम पाणी प्यायल्यास कॅलरीज आणि चरबी कमी होण्यास मदत होईल. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्या.
३) भूक कमी लागते
गरम पाणी पिण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा की यामुळे भूक कमी लागते. भूक कमी झाल्यानं तुम्ही कमी खाता आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते.
४) गॅस अपचनाचा त्रासही होणार नाही
गरम पाण्याचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी पोटाच्या समस्या दूर होऊ लागतात. पचन व्यवस्थित झाल्यामुळे वजन कमी होऊ लागते. जेवताना पाणी पिणं टाळा, जेवणाच्या अर्धातास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी प्या. सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी असं काहीही घेण्यापेक्षा गरम पाणी प्या.