Join us  

साजूक तूप खाता, पण तूप खाऊन पोट बिघडलं तर? डॉक्टर सांगतात, तूप खाण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 9:08 AM

Best Way to Eat Desi Ghee : व्यवस्थित पचन न झाल्यास पोट बिघडू शकते. मलाचा घाणेरडा वास येतो याला स्टिटोरिया असंही म्हणतात.

प्राचीन काळापासून भारतात साजूक  तूप ताकद वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी वापरले जात आहे. याच्या सेवनानं शरीरातील कोरडेपणा आणि कमकुवतपणा कमी होतो. (Best Way to Eat Desi Ghee) इतकंच नाही तर आयुर्वेदात गॅस, एसिडिटीसारख्या समस्या टाळण्यासाठी तुपाचा वापर पुर्वापार केला  जात आहे. काही लोक रिकाम्या पोटी तूप खातात कारण यामुळे पचनक्रिया चांगली राहते. खरंच रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने तब्येतीला फायदे मिळतात का याबाबत आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. रेखा राधामनी यांनी अधिक माहिती दिली आहे. (Never do this mistakes while eating Ghee)

रिकाम्या पोटी तूप का खाऊ नये

आयुर्वेदीक डॉक्टर रेखा यांनी रिकाम्या पोटी तूप न खाण्याचा सल्ला दिला आहे. हा एक जड खाद्यपदार्थ आहे.  जो पचवण्यासाठी शरीराला बरीच मेहनत करावी लागते.  व्यवस्थित पचन न झाल्यास पोट बिघडू शकते. मलाचा घाणेरडा वास येतो याला स्टिटोरिया असंही म्हणतात.

तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती

डॉ. रेखा यांनी सांगितले की खाण्याआधी तूप व्यवस्थित शिजवणं गरजेचं असतं. तुम्ही साजूक तुपात डाळ किंवा भाजी बनवू शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील आणि पचनक्रिया सुधारेल. संशोधनानुसार स्टिटोरिया, डिहायड्रेश आणि हार्ट फेलिअरमध्ये  घनिष्ट संबंध आहे.  तूप व्यवस्थित न पचल्याने डिहायड्रेशन होऊ शकतं. यामुळे हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो. 

तूप खाण्याचे के फायदे

१)रोज तूप खाल्ल्याने भूक आणि झोपेच्या समस्या कमी होतात.  लहान मुलं आणि मोठ्यांसाठीही तुपाचे सेवन फायदेशीर ठरते.  ज्यांना झोप न येण्याची समस्या असते त्यांनी आपल्या आहारात एक चमचा तुपाचा समावेश करावा. 

२) साजूक तूपात अनेक व्हिटामीन्स असतात ज्यामुळे शरीर फिट राहते. तुपात व्हिटामीन ई असते. ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहतात. स्काल्पवरील कोंडा, खाज उद्भवत नाही. तुप खाल्ल्याने दातांचे आरोग्यही चांगले राहते. 

एका व्यक्तीने दिवसाला किती तूप खावे

रोज जास्त तूप किंवा तुपाचे पदार्थ खाणं चुकीचं ठरतं. कारण हे एक हाय कॅलरी फूड आहे आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढतं. तुपात  सॅच्युरेडेट फॅट्सही जास्त प्रमाणात असतात. दिवसभरात १ ते २ चमचे तूप प्रत्येक व्यक्तीने खायला हवे.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स