आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जीवनशैली चांगली असणं महत्वाचे असते. (Rice Eating Way for Weight Loss) जर तुम्ही आहार व्यवस्थित घेत नसाल तर याचा फक्त वजनावरच नाही तर ओव्हरऑल हेल्थवरही होतो. कारण वेळेवर खाणं पिणं नसेल तर इम्यूनिटी कमकुवत होते. चुकीच्या डायजेशनमुळे गंभीर आजारही होऊ शकतात. (Best Way to Eat Rice For Weight Loss) आहारतज्ज्ञांच्यामते जर भात खाण्यावर कंट्रोल ठेवू शकत नसाल आणि वजनही कमी करायचं असेल तर भात खाताना छोटा बदल केला तर चांगला परिणाम दिसून येईल. इतकंच नाही आरोग्याला बरेच फायदे मिळतील. आहारातज्ज्ञ सिमरन कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Right way to Eat Rice For Weight Loss)
वजन कमी करण्यासाठी दही भात हा उत्तम उपाय (How to Eat Rice For Weight Loss)
कोकिलाबेन हॉस्पिट्ल्सच्या माहितीनुसार दही भातात प्रोटीन्स, कॅल्शियम, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात. दह्यात प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्यही चांगले राहते. हे एक रिफ्रेशिंग मील असून दुपारच्या जेवणसाठी उत्तम पर्याय आहे.
दही भात खाल्ल्याने काय फायदे मिळतात? (Curd Rice Eating Benefits)
१) दही भात वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यात आयर्न, मॅग्नेशियम, यासह व्हिटामीन्स, प्रोटीन्स आणि इतर न्युट्रिएंट्स असतात.
२) कर्ड राईसमध्ये मीठाचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे ब्लड शुगर रेग्युलेशन चांगले होते आणि बीपी कंट्रोलमध्ये राहते. ज्यांचे ब्लड प्रेशर वाढले आहे. त्यांनी या पदार्थांचे सेवन करायला हवे. हा प्रोबायोटिक्सचा एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
केस पांढरे पण ऐन तारुण्यात डाय नको वाटतो? शहनाज हुसैन सांगतात ३ उपाय, केस होतील काळेभोर
३) दह्यात कॅल्शियम असते त्यातील प्रोबायोटिक्स, मेटाबॉलिक रेट वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
४) शरीरासाठी थंड असल्यामुळे अनेकजण ऊन्हाळ्याच्या दिवसांत दही-भात खातात. पण तुम्ही हिवाळ्यातही आपल्या आहारात याचा समावेश करू शकता. यामुळे शरीराचे तापमान मॅनेज करण्यास मदत होते.
५) दह्यात शरीरासाठी आवश्यक असणारे प्रोटीन्स असतात आणि कार्ब्सही असतात. या दोन्हींमुळे शरीराल एनर्जी मिळते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. तुम्ही फोडणीसाठी कढीपत्तासुद्धा वापरू शकता.
गुडघे ठणकतात-हाडं खिळखिळी झाली? व्हिटामीन B-12 देणारे ८ व्हेज पदार्थ नियमित खा; फिट राहाल
६) दही भात करण्यासाठी शिजवलेल्या भातात रूम टेंम्परेचरवर असलेलं दही मिसळा. त्यात कडीपत्ता, मोहोरी, लाल मिरचीची फोडणी घाला. गोड आवडत असेल तर तुम्ही यात साखरही घालू शकता.