वजन वाढलंय, पोट बाहेर आलंय अशा तब्येतीच्या समस्या आजकाल सर्वांनाच जाणवतात. तब्येतीला उत्तम म्हणून अनेकजण डाळ, भात, चपाती, भाकरी असं पूर्ण जेवण करतात पण वजन कमी करायचं म्हणून काहीजण जेवण पूर्ण बंद करतात तर काहीजण भूक असतानाही कमी खातात. (Best Way to Preventing Weight Gain)
कमी जेवल्यानं, उपाशी राहिल्यानं वजन कमी होतं का? याबबत आरोग्य तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. आहारतज्ज्ञ ऋचा डोशी यांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून याबाबत अधिक माहिती दिली आहे. कमी खाल्ल्यानं कॅलरी कमी करण्यास मदत होते यात पूर्ण तथ्य नाही. जेव्हा आपण कमी खातो तेव्हा शरीरात चरबी साठून राहते. (Easy Ways to Stop Weight Gain)
- लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात जीवनसत्त्वांचा समावेश करा. काजू, फळे आणि पालेभाज्या खा. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी लिंबू, पेरू, संत्री पपई यासारख्या व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चांगला आहार घ्या. मोहरीचे तेल, राईस ब्रान ऑईल, ऑलिव्ह ऑईल, तिळाचे तेल, शेंगदाणा तेल इत्यादींचा आहारात वापर करा. पण ट्रान्स फॅट टाळा.
- रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्याने तुम्ही तुमचे ध्येय लवकर गाठू शकता. तसेच रात्री जेवणानंतर बडीशेप खा. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
- वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर फायदेशीर ठरेल. ते न्याहारीपूर्वी आणि झोपण्यापूर्वी घेतले जाऊ शकते.म धाचे सेवन करा कारण त्यात असलेले आवश्यक हार्मोन्स भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
- शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चयापचयावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे शरीर चरबी जाळू शकत नाही, पण जास्त पाणी प्यायल्याने भूकही नियंत्रणात राहते आणि वजनही वाढत नाही. वजन वाढ टाळण्यासाठी काय करायचं?
१) दिवसाची सुरूवात कोमट पाण्यानं करा. नाश्त्याला हेल्दी पदार्थ खा
२) रोज पुरेसं पाणी प्या.
३) जास्त ताण घेऊ नका. चांगली झोप घ्या