भारतात भात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे. भात खाण्याशी संबंधित अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. भात खाल्ल्याने वजन वाढतं भात खाल्ल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतो असे अनेक समज आहेत. जर तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भात खाण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. (Rice Preparation For Weight Loss And Improved Health)
आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांच्यामते तांदूळ कार्बोहायड्रेट्सने परिपूर्ण असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भाताचा आहारात समावेश करू शकता. (Best Ways To Cook Rice Ayurvedically To Get Maximum Health Benefits)
भात ग्लुटेन फ्री असून यात आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटामीन बी यांसारखी पोषक तत्व असतात. भातात सोडियमचे प्रमाणही कमी असते. याव्यतिरिक्त फायबर्सही मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे अन्न पचायला मदत होते आणि ब्लड शुगल लेव्हल नियंत्रणात राहते. (What Is Right Way to Cook Rice)
तांदूळ शिजवण्याची आयुर्वेदीक पद्धत कोणती?
आयुर्वेदात जेवण पचण्याच्या प्रक्रियेला बरचे महत्व दिले गेले आहे. जेणेकरून आतड्यातील पोषक तत्वांचे अवशोषण अनुकूलित होईल. आयुर्वेद जेवण बनवण्याच्या आधी अन्न भाजण्याचा सल्ला देते. ज्यामुळे पाण्याचे प्रमाण वाढून पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत यशस्वी होतील मुलं; लहानपणापासूनच 'या' १० सवयी लावा-यशाचं सोपं सिकेट
तांदूळ भाजून घ्या
तांदूळ भाजल्याने स्टार्चची संरचना बदलते आणि त्यातील काही घटक कॅरामेलाईज होतात. भाजण्याच्या प्रक्रियेत स्टार्च कमी होते. भात चिपचिपीत होत नाही आणि मऊ-मोकळा होतो.
भात करण्याची योग्य पद्धत कोणती?
तांदूळ भाजल्यानंतर तुम्ही ते दीर्घकाळ स्टोअर करून ठेवू शकता. १ वाटी भाजलेल्या तांदूळात ४ भाग पाणी घाला. १ चमचा गाईचे तूप आणि चवीनुसार मीठ घाला आणि तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्या, पाणी गाळून घ्या. हे पाणी तुम्ही इतर कामांसाठी वापरू शकता.
रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम
डाळ, भाजी किंवा कशाही बरोबर तुम्ही या भाताचा आनंद घेऊ शकता. या पद्धतीने भात बनवल्यास वजन वाढू शकते याशिवाय इतर गंभीर समस्याही उद्भवू शकतात. लक्षात ठेवा की यात शुद्ध गाईचे तूप मिसळायला विसरू नका. ज्यामुळे यातील पोषक तत्व वाढतील.