Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल

Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल

Best Ways To Detox Body : जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरात साचलेली घाण बाहेर  काढल्यास अनेक रोग टाळता येतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:49 PM2022-08-17T12:49:26+5:302022-08-17T13:17:13+5:30

Best Ways To Detox Body : जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरात साचलेली घाण बाहेर  काढल्यास अनेक रोग टाळता येतात.

Best Ways To Detox Body : Ayurveda doctor share 4 simple and effective ways to detox body naturally | Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल

Best Ways To Detox Body : शरीरातले घातक पदार्थ बाहेर काढतील ५ उपाय; आजारांपासून चार हात लांब राहाल

खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, प्रदूषण, धुम्रपान, मद्यपान, शारीरिक हालचाली न करणे या सर्व गोष्टींचा लोकांच्या मनावर आणि शरीरावर ताण पडत आहे. आरोग्य आणि फिटनेसबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्हाला मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण बनवू शकतो. (Best Ways To Detox Body) अशा जीवनशैलीतील आजारांपासून दूर राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे बॉडी डिटॉक्स. याचा अर्थ शरीराची अंतर्गत स्वच्छता. असे मानले जाते की शरीरात साचलेली घाण बाहेर  काढल्यास अनेक रोग टाळता येतात. (Ayurveda doctor share 4 simple and effective ways to detox body naturally)

आयुर्वेदात बॉडी डिटॉक्स जास्त चांगले मानले जाते. हे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकते.  आयुर्वेदिक डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका वेबसाईटशी बोलताना शरीर डिटॉक्स करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. ज्याद्वारे तुम्ही शरीरातील प्रत्येक अवयव स्वच्छ करून त्यांना मजबूत बनवण्यात मदत करू शकता.

शरीरात घाण जमा होण्याचे कारण

आयुर्वेदानुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये वात, पित्त, कफ हे त्रिदोष असतात, जे संतुलित असताना शरीराच्या विविध कार्यांवर परिणाम करतात. जीवनशैलीतील घटकांमुळे, त्रिदोषाचा समतोल बिघडू शकतो, ज्यामुळे शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात.

नेती पॉट

नेती पॉट ही प्राचीन आयुर्वेदिक पद्धत आहे. जी श्वसन प्रणालीला बळकट करण्यास, सायनस उघडण्यास,  याशिवाय अतिरिक्त कफ बाहेर काढून टाकण्यास आणि प्राणायाम (श्वासोच्छवासाचे व्यायाम) सराव करण्यास मदत करू शकतात. नेती पॉट करण्यासाठी, तुम्हाला नेटी पॉट आवश्यक आहे, जो लहान टीपॉटसारखा दिसतो आणि सामान्यतः सिरॅमिकचा बनलेला असतो.

धौती क्रिया

घसा, दात आणि पोट साफ करण्यासाठी सकाळी लवकर रिकाम्या पोटी धौती क्रिया केली जाते. न पचलेले पदार्थ आणि पोटातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ही एक प्रकारची पोट स्वच्छ करण प्रक्रिया आहे, ज्यामुळे आम्लता कमी होते, अन्नाची ऍलर्जी आणि दमा यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. धौती क्रिया केल्याने शरीराचे नैसर्गिक संतुलन पूर्ववत होते आणि अति पित्त, कफ आणि विषारी पदार्थ काढून टाकले जातात.

ऑईल पुलिंग

ऑईल पुलिंग हे एक आयुर्वेदिक दंत तंत्र आहे जे मुळे आणि हिरड्या मजबूत होऊन तोंडाचे आरोग्य सुधारते, हिरड्यांना आलेली सूज  बरी होते. आणि दात पांढरे होतात.  दातांच्या आरोग्याव्यतिरिक्त, हे तंत्र झोपेच्या समस्या, मुरुम, सोरायसिस आणि सायनसचे विकार कमी करण्यास देखील मदत करते.

कपालभाती

कपालभाती हे फुफ्फुस आणि मूत्रपिंडांचे कार्य सुधारण्यासाठी आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी एक शक्तिशाली आयुर्वेदिक उपाय आहे.  नाकपुड्यांमधून श्वास घेणे आणि सोडणे ही साधी क्रिया शरीरात ऑक्सिजन वाढवण्यास, बद्धकोष्ठता, सायनस, मधुमेह, रक्तदाब, हृदयाच्या समस्या, हर्निया बरे करण्यास आणि संपूर्ण शरीराला परिपूर्ण संतुलनात आणण्यास मदत करू शकते.
 

Web Title: Best Ways To Detox Body : Ayurveda doctor share 4 simple and effective ways to detox body naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.