Join us  

पोट सुटलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:21 AM

Best Weight Loss Tips : फास्टींगच्या २ दिवसांत लो कॅलरीज पोषक तत्वांनी परीपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करा.

वाढतं वजन एक अशी समस्या आहे, ज्याचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे. बाजारात मिळणाऱ्या  जंक फूडच्या सेवनामुळे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकालाच या समस्येचा सामना करावा लागत आहे.  कोणाचे पोट खराब होते तर शरीरातील  कोलेस्टेरॉल लेव्हल बिघडू लागते आणि वजनही वाढते. (Best Weight Loss Tips). व्यस्त जीवनशैलीत तुम्ही फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डायटिंगचा आधार घेऊ शकता. 5:02 डायटिंग केल्यानं तुम्ही सोप्या पद्धतीनं वजन कमी करू शकता. 5:02  ही डायटिंगची मेथड ट्राय केल्यानं तुम्हाला गंभीर समस्या टाळण्यास मदत होईल.

वजन  कमी करण्यासाठी 5:02  इंटरमिटेंट फास्टींग तुम्ही करू शकता. यात  5 दिवस तुम्हाला साधं जेवण करायचं आहे आणि 2 दिवस उपवास ठेवायचा आहे. म्हणजेच २ दिवस हे फास्टींगचे दिवस असतात. तुम्ही ५ दिवस नॉर्मल पदार्थ  खाऊ शकता. पण 2 दिवसांतील कॅलरीज लक्षात घेऊन खायला हवं. जसं उपवासाच्या दिवशी खाल्लं जातं.

ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या रिपोर्टनुसार 5:02  चे डाएट इंटरमिटेंट फास्टींगवर आधारीत आहे. अधून मधून उपवास केल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झाले आहे की इंटरमिटेंट फास्टींगमुळे वजन कमी होण्यास मदत होते. कोरोनरी हार्ट डिसिज, डायबिटीसचा धोका टाळण्यास मदत होते.  या डाएटमध्ये ५ दिवस तुम्ही हेल्दी पदार्थांचा समावेश करा. ज्या दिवशी उपवास ठेवता तेव्हा जवळपास 500 ते 600 कॅलरीजचे सेवन करा. 

फास्टींगच्या २ दिवसांत  काय खावे

फास्टींगच्या २ दिवसांत लो कॅलरीज पोषक तत्वांनी परीपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमध्ये फायबर्स असायला हवेत ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील आणि पोट जास्तवेळ भरलेलं राहील. ज्या २ दिवसांत तुम्ही कमी खाल तेव्हा आहारात अल्कोहोल, कॉफी, शुगर, क्रिम, ब्रेड, तांदूळ, बटाटा, पास्ता, तूप याचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कॅलरीजकडे लक्ष देता आठवड्यातून २ दिवस १ किंवा दोनच मिल्स घ्या. 

दूध-दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ७ पदार्थ; रोज खा-मिळेल भरपूर ताकद-कंबरदुखी टळेल

नॉर्मल दिवसांमध्ये काय खावं?

इंटरमिटेंट फास्टींगच्या पद्धतीत  5 दिवसांत तुम्ही साधं जेवण खाऊ शकता.  या दिवसांत नॉर्मल दिवसांच्या गरजेनुसार कॅलरीज घेतल्या जातात. खाण्यापिण्यात फळं, भाज्या, प्रोटीन, डाळी, सुका मेवा, बीया, पूर्ण अनाज, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स आणि हेल्दी फॅट्सचा समावेश केला जाऊ शकतो. 

या प्रकारच्या डायटिंगचे फायदे-तोटे

ही सोप्या पद्धतीची डायटींग आहे. यात दिवसभरात काय खावे काय नाही याचे बंधन नसते.  या डाएट प्रकारामध्ये तुम्ही आपल्या मनानुसार खाऊ शकता. या प्रकारचे इंटरमिटेंट फास्टींग शरीर उत्तमरित्या स्वीकारते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. इंफ्लेमेशन आणि सांधेदुखीच्या वेदनाही जाणवत नाहीत.

फेशियलचा ग्लो निघाला-चेहरा काळवंडला? मुल्तानी मातीचा १ खास उपाय; चेहऱ्यावर येईल तेज

या डाएटींगचा एक तोटा असा की फास्टींगच्या २ दिवसांत तुम्ही चुकून ओव्हरइंटीग करू शकता. योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड न केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. या डाएटींगमध्ये  फास्टींगच्या दिवसांत प्रोसेस्ड फूडस, चिप्स, सोडा आणि फ्राईड  फूड्सचे सेवन करू शकता. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स