बॉलिवूडची फिट अभिनेत्री आणि न्युट्रिशनिस्ट भाग्यश्री (Bhagyashree) या सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असात. त्यांचे फॅन्ससोबत त्या नेहमीच हेल्थ आणि फिटनेस संबंधित टिप्स शेअर करत असतात. भाग्यश्रीने आपल्या ट्युजडे टिपमध्ये महिलांच्या काही समस्यांबाबत सांगितले. तिने दंडांची चरबी कमी करण्यासाठी कोणते व्यायाम सोप्या पद्धतीने करता येतील याबाबत सांगितले. (Bhaghyashree Says Simple Exercises To Reduce Flabby Arms)
व्यायामाचा व्हिडिओ शेअर करत तिनं कॅप्शन दिले की, लटकणारे दंड लपवण्यासाठी लांब बाह्याचे कपडे घालण्याची काही गरज नाही. हा एक सोपा व्यायाम आहे. याच्या मदतीने तुम्ही फॅट सहज कमी करू शकता. रोज हा व्यायाम केल्याने एका महिन्यात तुम्हाला फरक जाणवेल. हे व्यायाम प्रकार कोणत्या पद्धतीने करता येतील ते समजून घेऊ.
1) व्यायाम क्रमांक १
हा व्यायाम करण्यासाठी सगळयात आधी उभं राहा. दोन्ही हातांनी खांदे बरोबर साईडला ठेवा. हात पसरवत समोरच्या दिशेने ठेवा. आता दोन्ही हात मागे-पुढे हलवा. कमीत कमी २० वेळा हा व्यायाम करा.
2) व्यायाम क्रमांक २
सगळ्यात आधी सरळ उभे राहा. हात दोन्ही बाजूंनी पसरवा. दोन्ही हात खालच्या बाजूला हलवा. हा व्यायाम कमीत कमी 20 वेळा करा.
3) व्यायाम क्रमांक ३
आधी सरळ उभे राहा, हात बाजूंनी सरळ करा. हाताचा पंजा खालच्या बाजूनं असावा. नंतर हात हलवा. त्यानंतर हात वरच्या बाजूने ओढून वर- खाली हलवा. हात चारही बाजूंनी कमीत कमी ३० सेकंद हलवत राहा. जवळपास २० वेळा हा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येईल.
4) व्यायाम क्रमांक- ४
आधी सरळ उभे राहा, नंतर हात डाव्या बाजूला फिरवा नंतर हात लॉक करा आणि स्ट्रेच करा. नंतर दुसऱ्या हाताबरोबरही सेम गोष्ट करा. हा व्यायाम तुम्ही १० ते २० वेळा करू शकता.
दिवसभरात भरपूर चालणं होतं तरी पोट सुटतंय? चालताना १ गोष्ट करा, भराभर घटेल वजन
व्यायाम करण्याचे फायदे
हा व्यायाम केल्याने हात लवचीक होतील आणि हातांचे एक्स्ट्रा फॅट कमी होते, हातांची लटकणारी चरबी टाईट होते. दंडांचे मसल्स एक्टिव्ह होतात आणि हातही मजबूत होतात. ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि शरीर एक्टिव्ह होण्यास मदत होईल. खांदे, ट्रायसेप्स, बायसेप्स आणि मसल्स टोन्ड होण्यास मदत होईल आणि शरीराचे पोश्चरही चांगले राहण्यास मदत होईल.
डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्त्याला ‘हे’ पदार्थ अजिबात खाऊ नका, तब्येत कायमची बिघडेल
खराब लाईफस्टाईल, अन्हेल्दी डाएट, फिजकल एक्टिव्हनेसची कमतरता आणि आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे शरीराच्या अनेक भागांत चरबी वाढू लागते. खासकरून हात आणि मांड्याची चरबी लटकताना दिसते. या व्यायामाच्या मदतीने तुम्ही एका महिन्यात वाढलेलं फॅट कमी करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी तुम्ही अभिनेत्री भाग्यश्रीचे इंस्टाग्राम व्हिडिओजही पाहू शकता.