अभिनेता सलमान खानसोबत चित्रपटात डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तिने पन्नाशी पार जरी केली असली तरी, ती दिसायला तितकीच फिट व तरुण दिसते. भाग्यश्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. फिटनेस रुटीनचे व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिने नुकतंच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती कार्डिओचे हेल्थ बेनिफिट्स सांगताना दिसून येत आहे.
जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, कार्डिओच्या मदतीने आपण अतिरिक्त चरबी कमी करू शकता. चला तर मग कार्डिओचे महत्त्व काय? व याने वजन कसे कमी होईल हे पाहूयात(Bhagyashree’s cardio workout is the only fitness goal you need to set this week).
भाग्यश्री सांगते कार्डिओचे महत्त्व
लेटेस्ट व्हिडिओमध्ये भाग्यश्री कार्डिओ करताना दिसून येत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, 'कार्डिओ हा तुमच्या वर्कआउटचा अविभाज्य भाग असला पाहिजे. यामुळे कॅलरीज बर्न तर होतातच पण हृदयही निरोगी राहते. या व्यायामामुळे स्टेमिना वाढतो. जर आपण कार्डिओ करायला सुरू करणार असाल तर, आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. किंवा ट्रेनरच्या प्रशिक्षणाखाली करा.''
जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय
ती पुढे म्हणते, ''आपण सकाळी कार्डिओचा रूटीन पाळला पाहिजे. हा व्यायाम केल्याने आपले चयापचय वाढते यासह, शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. हा व्यायाम केल्याने दिवसभर मूड फ्रेश राहतो. दिवसातून किमान ३० मिनिटे दररोज कार्डिओ करायला हवे.''
जिमला जायला वेळ नाही, डाएटचे तीन तेरा? फक्त २० मिनिटं ४ गोष्टी करा, सुटलेलं शरीर होईल सुडौल
कार्डिओ म्हणजे काय?
कार्डिओला कार्डियोवैस्कुलर व्यायाम म्हणून ओळखले जाते. हा एक एरोबिकचा भाग आहे. हे करत असताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी योग्य असायला हवी. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांना हे करायचे असल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हा व्यायाम केल्याने आपले फुफ्फुस आणि हृदय निरोगी राहते.