Join us  

भूमी पेडणेकर म्हणते, मी खाण्यासाठी प्रवास करते....तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 3:21 PM

खाणं हा अनेकांचा वीक पॉइंट असतो, या खाण्यासाठी ते कधी काय करतील सांगता येत नाही. अभिनेत्री भूमी पेडणेकरही त्यातलीच एक. खायची आवड असणाऱ्या भूमीचा व्हायरल व्हिडियो पाहा आणि तुम्हीही तिच्यासारखी एखादी सफर करुन या...

ठळक मुद्देखाण्यासाठी जन्म आपुला, भूमी पेडणेकरचा भन्नाट व्हिडियो पाहाचखवय्ये खाण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही

जगाची टूर करणे किंवा अगदी आपल्या बकेट लिस्टमधली आपण ठरवलेली डेस्टीनेशनला भेट देणे हे प्रत्येक महिलेसाठी एक स्वप्न असते. फिरल्यामुळे आपण रिलॅक्स होतो आणि जगातील वेगवेगळ्या गोष्टींबाबत आपल्याला माहिती घेता येते असे जरी असले तरी अनेकींना वेगळी ठिकाणे पाहायला आवडतात म्हणून, तर काहींना शॉपिंगची हौस असते म्हणून त्या वेगवेगळ्या टूरवर फिरायला जातात. याप्रमाणेच खाण्याची आवड आहे म्हणून फिरणारेही बरेच असतात. एखाद्या आवडत्या पदार्थासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करुन जाणारे काही खवय्ये तुमच्या-आमच्या आजुबाजूला असतात. तसेच बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरही मी खाण्यासाठी प्रवास करते असे म्हणते. स्वत:ला फूडी म्हणवणाऱ्या भूमीने नुकताच तिचा एक व्हिडियो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये भूमी पिझ्झा, वॅफल्स, आइस्क्रीम, क्रिमी चिजकेक यांचा समावेश आहे. अभिनयानं सर्वांचे मन जिंकणाऱ्या भूमीला चाहत्यांनी खूप पसंती मिळते. भूमीचा हॉट अवतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. सोशल मीडियावर ती भरपूर अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते.

या व्हिडियोमध्ये भूमी परदेशात असल्याचे दिसत असून ती तेथील पदार्थांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. विविध प्रांतातले, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. असेच वेगवेगळ्या प्रकारचे केक, आयस्क्रीम, सॅलेड, पेये आणि इतरही अनेक पदार्थ भूमीने पोस्ट केलेल्या व्हिडियोमध्ये दिसत आहेत. आपल्या या पोस्टला तिने कॅप्शनही तशीच दिली आहे. ती म्हणते मी खाण्यासाठी फिरते, त्याचा मला 0 % गिल्ट आणि 100 % आनंद आहे. म्हणजेच मला खाण्यासाठी फिरण्याच्या गोष्टीतून खूप आनंद मिळत असून अशाप्रकारे खायला फिरणे याबाबत मला अजिबातच गिल्ट नाही असे तिचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आलेल्या तिच्या या व्हिडियोला ८६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून ५०० हून अधिक जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 

 

भूमी पेडणेकर बॉलिवूडमध्ये येण्याआधी खूप जाड होती. करियरसाठी तिने स्वत:मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. यावेळी भूमीने व्यायाम आणि डाएट करत एक -दोन नाही तर तब्बल २१ किलो वजन घटवले होते. हे तिने केवळ ४ महिन्यात केले होते. भूमी फिटनेसबाबत खूप जागरुक आहे, पण तिला आवडणारे पदार्थ खाताना ती मागे-पुढे बघत नाही असेच या व्हिडियोमधून दिसते.  असे असले तरी तिचे स्वत:च्या खाण्यावर नियंत्रण असणारच यामध्ये शंका नाही. २०१५  मध्ये तिन बॉलिवूडमधील प्रवेशासाठी वजन कमी केल्यानंतर तरुणींसाठी ती प्रेरणा ठरत असल्याचे पाहायला मिळाले होते.  त्यामुळे आताच्या व्हिडियोमधूनही तुम्हाला आवडते ती गोष्ट बिनधास्त करा असेच तर भूमीला सांगायचे नसेल ना...

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यपौष्टिक आहार