Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डिटॉक्ससाठी अवघड गोष्टी करताय? एकच सोपी गोष्ट करा आरामात, तब्येतीसाठी फार आवश्यक

डिटॉक्ससाठी अवघड गोष्टी करताय? एकच सोपी गोष्ट करा आरामात, तब्येतीसाठी फार आवश्यक

Fitness tips: शरीर डिटॉक्स करणं (body detox) म्हणजे शरीरातील सगळे विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकून देणं.... असं जर तुम्हाला करायचं असेल, तर बाकी सगळं विसरा आणि फक्त एवढं एक करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 12:05 PM2021-12-31T12:05:26+5:302021-12-31T12:10:02+5:30

Fitness tips: शरीर डिटॉक्स करणं (body detox) म्हणजे शरीरातील सगळे विषारी द्रव्य शरीराबाहेर टाकून देणं.... असं जर तुम्हाला करायचं असेल, तर बाकी सगळं विसरा आणि फक्त एवढं एक करा...

The biggest solution for natural body detox is complete and sound sleep in night, benefits of sleep | डिटॉक्ससाठी अवघड गोष्टी करताय? एकच सोपी गोष्ट करा आरामात, तब्येतीसाठी फार आवश्यक

डिटॉक्ससाठी अवघड गोष्टी करताय? एकच सोपी गोष्ट करा आरामात, तब्येतीसाठी फार आवश्यक

Highlightsशरीर डिटॉक्स केले नाही, तर आपल्या शरीरात विषारी घटक तसेच राहतात आणि हळूहळू ते आपलं शरीर खराब करतात.

आपलं घर घाण होऊ नये म्हणून आपण रोजच्या रोज घर झाडतो, फरशा पुसतो, घरातल्या फर्निचरवर वस्तूंवर कपडा मारून त्या स्वच्छ करतो. आपण रोजच्या रोज अशी काळजी घेतो, म्हणून घर स्वच्छ राहतं.. अशीच कळजी आपल्या शरीराचीही घ्यावी लागते. कारण शरीर स्वच्छ (body detox) रहावं म्हणून. आपल्या शरीरातून विषारी द्रव्ये, टॉक्सिन्स (how to detox our body naturally) वेळोवेळी बाहेर टाकून देण्याची खूप गरज असते. शरीरातून असे विषारी घटक बाहेर फेकून देणे म्हणजेच शरीर डिटॉक्स (how to remove toxins from the body) करणे होय.

 

शरीर डिटॉक्स केले नाही, तर आपल्या शरीरात विषारी घटक तसेच राहतात आणि हळूहळू ते आपलं शरीर खराब करतात. त्यातूनच मग आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. अनेक आजारांना निमंत्रण मिळते. केस गळणे (hair fall), त्वचा खराब होणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे (pimples), त्वचेसंदर्भात विविध आजार एवढंच नव्हे तर शरीर स्थुल होत जाणे, पचनसंस्थेचे कार्य बिघडणे असे अनेक आजार यातून निर्माण होतात. असा सगळा त्रास जर होऊ द्यायचा नसेल, तर आपलं शरीर रेग्युलर डिटॉक्स (regular body detox) करणं खूप गरजेचं आहे.

 

शरीर डिटॉक्स करण्यासाठी अनेक घरगुती उपाय सांगितले जातात. यापैकी एक उपाय म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस. असं पाणी दररोज प्यायल्यास बॉडी डिटॉक्स होत जाते. दुसरा एक नेहमी सांगितला जाणारा सोपा उपाय म्हणजे दररोज भरपूर पाणी पिणे. आपण योग्य प्रमाणात पाणी प्यायले तर पाण्यासोबत शरीरातले टॉक्सिन्सही बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होते. काही जणं असंही सांगतात की साजूक तूप जर आपण योग्य प्रमाणात नियमितपणे घेत गेलो, तरीही त्यामुळे शरीराची आतून स्वच्छता होत जाते.

 

हे सगळे उपाय तर कराच, पण यासोबतच एक खूपच सोपा उपाय सांगितला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी. त्यांनी एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बॉडी डिटॉक्स करण्याचा सगळ्यात उत्तम उपाय सांगितला. त्या म्हणतात की साजूक तूप, लिंबू पाणी यापेक्षा रोज रात्रीची शांत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुर्ण झोप हा शरीर डिटॉक्स करण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे.

 

आजकाल नाईट कल्चर खूप वाढलं आहे. नाईट लाईफ एन्जॉय नाही केलं तर आयुष्यात काय केलं... असा दृष्टीकोन तरूण पिढीत निर्माण झाला आहे. शिवाय घरोघरी प्रत्येक हातात मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही तर आहेच. यामुळे रात्रीच्या झोपेचे तास कमी होऊन जागरण वाढत चाललं आहे. आपण झोपलेलो असताना आपलं शरीर विषारी द्रव्ये आपोआप शरीरातून बाहेर टाकत असतं आणि त्यामुळे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होत जातं. या संपूर्ण प्रक्रियेसाठी रात्रीची झोप ७ ते ८ तास होणं गरजेचं असतं. म्हणूनच तर रात्रीची झोप पुर्ण घ्या आणि फ्रेश व्हा.. 

 

Web Title: The biggest solution for natural body detox is complete and sound sleep in night, benefits of sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.