वेट लॉस करताना आपण अनेक गोष्टी करून पाहतो. आहारात कोणत्या गोष्टी कमी कराव्यात, कोणत्या गोष्टी वाढवाव्यात, या गोष्टी वजन कमी करताना मदत करतात. याशिवाय खाण्यापिण्याची योग्य वेळ असणेही खूप गरजेचं आहे. आपण आहारातून साखरयुक्त पेय - पदार्थ टाळून हेल्दी पदार्थाचं समावेश करतो. ज्यात ब्लॅक कॉफीचा देखील समावेश आहे.
ब्लॅक कॉफी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे मेटाबॉलिझमही सुधारते आणि पचनक्रियाही चांगली होते. परंतु, ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत माहित असणं गरजेचं आहे. योग्य आहार आणि व्यायाम केल्याशिवाय ही पद्धत फायदेशीर ठरणार नाही. ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती, याबाबतीत आहारतज्ज्ञ, पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट, स्वाती बथवाल यांनी माहिती दिली आहे(Weight loss: Does consuming black coffee help reduce body fat?).
चरबी जाळण्यासाठी प्या ब्लॅक कॉफी
ब्लॅक कॉफी म्हणजे दूध आणि साखर नसलेली कॉफी. ही कॉफी फक्त पाण्यात उकळून बनवली जाते.
आपण एका दिवसात 4 कप ब्लॅक कॉफी पिऊ शकता. फॅट जाळण्यासाठी ब्लॅक कॉफी प्या, मिल्क कॉफी टाळा. प्रत्येक 1 कप ब्लॅक कॉफीनंतर 2 कप पाणी प्या जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही.
वजन कमी करायचं तर आधी पचन सुधारा! करा ४ गोष्टी, झटपट कमी होतील नकोसे फॅट्स
1 कप ब्लॅक कॉफी अंदाजे 17 अतिरिक्त कॅलरीज बर्न करते. दिवसातून 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढते.
जर आपण व्यायामापूर्वी 300 मिलीग्राम कॅफिनचे सेवन केलं तर, तुमच्या वर्कआउटची इंटेंसिटी वाढेल.
ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर काय होते?
ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर सुमारे 6-7 तासांपर्यंत फॅट बर्न होण्यास मदत होते.
जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय
ज्या लोकांना ग्लूकोमा, निद्रानाश, बोन लॉस, यूरिनरी इश्यूज व एंग्जायटी जास्त आहे, त्यांनी ब्लॅक कॉफी पिणे टाळावे.
ब्लॅक कॉफीमुळे नैराश्य कमी होते.
ब्लॅक कॉफी यकृताच्या समस्यांपासून देखील आराम देते.
झोपेच्या 6 तास आधी कॉफी प्या. यानंतर कॉफी घेऊ नका, अन्यथा झोपेचा त्रास होऊ शकतो.
आपण कॉफी पिण्याचा रुटीन बनवू शकता. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होईल.