Join us  

बदाम-पनीरहून १० पट जास्त प्रोटीन देते चवळी; प्रोटीनसह कॅल्शियमही खच्चून मिळेल, हेल्दी राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 4:49 PM

Black Eyed Peas Cowpeas Nutrition Facts And Benefits : या डाळीचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे.

प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी लोक अंडी किंवा दूधाचे सेवन करतात.  (Health Tips) या दोन्हीमध्ये प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते आणि मसल्स मजबूत राहण्यासही मदत होते. (Cowpeas Nutrition Facts) तर तुम्ही व्हेजिटेरिनय असाल किंवा दूध प्यायलाही जास्त आवडत असेल तर  आपल्या आहारात डाळींचा समावेश करू शकता. (Black Eyed Peas Cowpeas Nutrition Facts And Benefits)

चवळीतील पोषक तत्व कोणती? (Health Benefits Of Cowpeas)

 नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार चवळीत पॉलिफेनॉल्सचे प्रमाण जास्त असते. शरीरात एंटीऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात. ज्यामुळे पेशींचे नुकसान  टाळण्यास मदत होते आणि आजारांपासूही संरक्षण होते.  १ वाटीभर चवळीमध्ये २ अंड्यांइतके प्रोटीन असते. चवळी ही सगळ्यात पॉवरफुल मानली जाते. (Health Benefits Of Cowpeas Nutrition Facts And Benefits) या डाळीचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. प्रोटीन आणि कॅल्शियमचा उत्तम सोर्स आहे. शरीर निरोगी बनवण्यासाठी चवळीची डाळ उत्तम मानली जाते. ही डाळ तब्येतीसाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते.

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार चवळीची डाळ व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. ही डाळ प्रोटीन, कॅल्शियम, फायबर्स आणि मिनरल्सचा उत्तम भंडार आहे (Ref). एक कप म्हणजेच १७० ग्राम  चवळीत १३ ग्राम प्रोटीन असते. जे अंड्याच्या तुलनेत दुप्पट असते. या डाळीत दुधाच्या तुलनेत  ४ पट जास्त प्रोटीन असते. १०० ग्राम दूधात ३.४ प्रोटीन असते. या डाळीचे सेवन केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. हाडांसाठी ही डाळ वरदान मानली जाते.

ऐन तारूण्यात कंबरदुखीने हैराण आहात? ५ पदार्थ खा; म्हातारे झालात तरी कंबरदुखी छळणार नाही

चवळी सकाळी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटते. ही डाळ मांसपेशींना मजबूत बनवते आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. या डाळीत फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामळे पचनासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. चवळीची डाळ मॅन्गनीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते आणि थकवा, कमकुवतपणा दूर होतो.

चवळी पॉवरफुल एंटी ऑक्सिडेंट्सचा खजिना मानली जाते. हे एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला उर्जा प्रदान करतात.  चवळीची डाळ डायबिटीसच्या रुग्णांसाठी रामबाण मानली जाते. अनेक संशोधनातून दिसून आले आहे की ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल  करण्यासाठी चवळी फायदेशीर ठरते. डायबिटीसच्या रुग्णांसाठीही चवळी फायदेशीर ठरते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स