Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ब्लॅक गार्लिक मॅजिक; काळ्या लसणाचे आहारात मोठे महत्त्व; पण असतो काय हा ब्लॅक गार्लिक?

ब्लॅक गार्लिक मॅजिक; काळ्या लसणाचे आहारात मोठे महत्त्व; पण असतो काय हा ब्लॅक गार्लिक?

ब्लॅक गार्लिकची नेहेमीच्या लसणाइतकी उग्र चव आणि गंध नसतो. विशिष्ट चवीसाठी म्हणून तो स्वयंपाकात वापरला जातो तसेच आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक गार्लिकचा विचार करता त्याला सुपरफूड असं म्हटलं जातं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 04:49 PM2021-10-04T16:49:57+5:302021-10-04T17:05:49+5:30

ब्लॅक गार्लिकची नेहेमीच्या लसणाइतकी उग्र चव आणि गंध नसतो. विशिष्ट चवीसाठी म्हणून तो स्वयंपाकात वापरला जातो तसेच आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक गार्लिकचा विचार करता त्याला सुपरफूड असं म्हटलं जातं.

Black Garlic Magic; Of great importance in the diet of black garlic; But what is this black garlic? | ब्लॅक गार्लिक मॅजिक; काळ्या लसणाचे आहारात मोठे महत्त्व; पण असतो काय हा ब्लॅक गार्लिक?

ब्लॅक गार्लिक मॅजिक; काळ्या लसणाचे आहारात मोठे महत्त्व; पण असतो काय हा ब्लॅक गार्लिक?

Highlights ब्लॅक गार्लिकमधे अनेक आरोग्यविषयक समस्यांशी लढण्याची क्षमता आहे. हायपरटेंशनही ब्लॅक गार्लिकमुळे कमी होतं. ब्लॅक गार्लिकमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे पचन व्यवस्थित होतं.शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्याची ताकद ब्लॅक गार्लिकमधील गुणधर्मात असते.

लसणाशिवाय भाजी आमटीला चव येणं अशक्य. तिखट पदार्थांमधे प्रामुख्यानं लसूण वापरलाच जातो. लसणाला असलेला उग्र वास आणि तिखट चव यामुळे पदार्थांची चव वाढते. लसणात औषधी गुणधर्म असल्यानं तो आहारात असायलाच हवा असं आहार आणि आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. नुसता लसूण खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. पण कच्चा लसूण खाणं हा त्याच्या तिखट चवीमुळे अवघड होतं.

Image: Google

पण या पारंपरिक लसणाला आणखी एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे ब्लॅक गार्लिकचा. त्याला काळा लसूण म्हणायचं नाही. ब्लॅक गार्लिक हेच त्याचं मूळ नाव आहे. हा लसूण आपल्याला ऐकायला नवीन आहे मात्र आशियाई पॅसिफिक देशात म्हणजे जपान, कोरिया, मलेशिया, म्यानमार, न्यूझिलण्ड या देशात फार पूर्वीपासून ब्लॅक गार्लिक खाल्ला जातो. ऑनलाइन शॉपिंगद्वारे हा ब्लॅक गार्लिक आपल्यालाही सहज घेता येतो. हा नेहेमीच्या लसणापेक्षा वेगळा असतो. रंगाने तर आहेच पण ब्लॅक गार्लिकची लसणाइतकी उग्र चव आणि गंध नसतो. विशिष्ट चवीसाठी म्हणून तो स्वयंपाकात वापरला जातो तसेच आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक गार्लिकचा विचार करता त्याला सुपरफूड असं म्हटलं जातं.

Image: Google

सुपरफूड ब्लॅक गार्लिक

* ब्लॅक गार्लिकमधे अनेक आरोग्यविषयक समस्यांशी लढण्याची क्षमता आहे. हायपरटेंशनही ब्लॅक गार्लिकमुळे कमी होतं. ब्लॅक गार्लिकमधे प्रथिनं मोठ्या प्रमाणात असतात तसेच त्यात ब जीवनसत्त्वंही असतं. ब्लॅक गार्लिकमधील गुणधर्मांमुळे कोलेस्ट्रेरॉल कमी होतं, टाइप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो. तसेच ताण आणि थकवाही निघून जातो.
ब्लॅक गार्लिकमधे अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे पचन व्यवस्थित होतं.शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. ब्लॅक गार्लिकमधे नेहेमीच्या लसणासारखे जीवाणूविरोधी आणि अँण्टिसेप्टिक गूण असतात. ब्लॅक गार्लिकमधे असलेलं क जीवनसत्त्वामुळे अन्नाची विषाणू आणि जीवाणुंपासून संरक्षण करण्याची ताकद वाढते.

* ब्लॅक गार्लिकला सुपरफूड का म्हटलं जातं त्याचं आणखी एक कारण म्हणजे शरीराला आवश्यक असे 10 अमिनो अँसिडस त्यापासून मिळतात. हे अमिनो अँसिडस शरीर स्वत: तयार करु शकत नाही. ते अन्नाद्वारे मिळवणं आवश्यक असतं.

* हदयाशीसंबंधित आजारांचा धोका कमी करण्याची ताकद ब्लॅक गार्लिकमधील गुणधर्मात असते. हदयांच्या धमण्यांची स्थिती सुधारण्याचं काम करुन ब्लॅक गार्लिकमधील गुणधर्म हदयाला धोका निर्माण करणारे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि ट्रिग्लीसिराइस यांची पातळी कमी करतं.

*   प्रथिनं आणि कोलॅजनचा एक मुख्य स्त्रोत म्हणून ब्लॅक गार्लिककडे बघितलं जातं. त्वचेचं आरोग्य सांभाळण्यात कोलॅजनची भूमिका मोठी असते. त्यामुळे त्वचेसाठी म्हणूनही ब्लॅक गार्लिकचं सेवन महत्त्वाचं मानलं जातं.

Image: Google

ब्लॅक गार्लिक बनतं कसं?

ब्लॅक गार्लिकची काही शेती नसते. आपल्या नेहेमीच्या लसणावर दमट तापमानाची विशिष्ट क्रिया करुन त्या वातावरणात बटर पेपर आणि सिल्व्हर फॉइलमधे गुंडाळून ठेवल्या लसूण कांड्या 30 ते 40 दिवस ठेवतात. या दमट प्रक्रियेनं ब्लॅक गार्लिक मऊ पडतो.त्याची उग्र चव जाते. ब्लॅक गार्लिकला विशिष्ट चव असते. तो थोडासा मसालेदार आणि गोड चवीचा लागतो.

आरोग्याच्या दृष्टीने ब्लॅक गार्लिकच्या दोन तीन पाकळ्या खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात तर स्वयंपाकात ब्लॅक गार्लिक हा प्रामुख्याने सलाड, टोस्ट, सूप, स्ट्यू यामधे बारीक तुकडे करुन वापरतात. ब्लॅक गार्लिक फोडणीत न घालता पदार्थ तयार झाल्यावर वरुन तुकडे करुन घातला जातो आणि मग पदार्थात व्यवस्थित मिसळला जातो.

Web Title: Black Garlic Magic; Of great importance in the diet of black garlic; But what is this black garlic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.