वजन कमी करण्यासाठी फायदेशीर पेय (weightloss drink) कोणतं यावर नुकताच एक अभ्यास झालेला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की ब्लॅक टी हा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ब्लॅक टी (black tea) प्याल्यानं फक्त वजनच कमी होतं असं नाही तर ब्लॅक टी हे आरोग्यदायी पेय (healthy black tea) असून रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ब्लॅक टीचा फायदा होतो. ब्लॅक टीमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं. कॅफीन या घटकामुळे शरीराला ताकद आणि ऊर्जा मिळते. ब्लॅक टीमुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि त्याचा फायदा (benefits of black tea) वजन कमी होण्यास होतो.
Image: Google
ब्लॅक टी पिण्याचे फायदे
1. ब्लॅक टी प्याल्यानं पचन क्रिया सुधारते. ब्लॅक टी मधील टॅनिनचा फायदा आरोग्यास मिळतो. ब्लॅक टीमध्ये सूजविरोधी घटक असतात. पोट फुगणं आणि पोटाशी निगडित समस्या ब्लॅक टी प्याल्यानं कमी होतात. पोटाच्या अल्सर या समस्येत आराम मिळण्यासाठी ब्लॅक टी फायदेशीर असतो. ब्लॅक टीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ब्लॅक टीमुळे आतड्यांचं कार्य सुधारतं. आतड्यांमध्ये चांगल्या जिवाणुंची निर्मिती होण्यास ब्लॅक टीमुळे फायदा होतो.
2. तणाव निर्माण करणाऱ्या काॅर्टिसोल हार्मोन्सचं नियंत्रण ब्लॅक टीमुळे होतं. दिवसातून 3-4 वेळा ब्लॅक टी प्याल्यानं तणाव कमी होण्यास मदत होते. तणाव नियंत्रणासोबतच ब्लॅक टी प्याल्यानं लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.
3. ब्लॅक टीमध्ये फ्लेवोनाॅइडसचं प्रमाण जास्त असतं. या घटकामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.
Image: Google
लिंबू घातलेला ब्लॅक टी
लिंबू घालून ब्लॅक टी करण्यासाठी एक टी बॅग किंवा 2 चमचे चहा पावडर, 1 ते दीड ग्लास पाणी आणि लिंबू घ्यावा. मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावं. पाणी 3-4 मिनिटं उकळू द्यावं. पाणी चांगलं उकळलं की त्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करुन चहा उकळू द्यावा. चहा उकळताना चमच्यानं मधून मधून हलवावा. नंतर चहा गाळून त्यात लिंबू पिळून घोट घोट करुन प्यावा.