अर्चना रायरीकर
निसर्गाने आपल्याला इतके काही दिले आहे की त्याच्या या देण्याबद्दल जितके बोलावे तितके ते कमीच आहे. निसर्गात झालेली ही रंगांची उधळण म्हणजे आजूबाजूचे जग आकर्षक आणि सुंदर बनवतात. मात्र हे जितके गहरे रंग तितके त्यात अँटी ऑक्सिडंट्स आणि असे काही पोषक घटक असतात की ज्यामुळे आपले चयापचय सुधारते आणि आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत याच्या आरोग्यासाठी याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होत असतो.
गाजरात केरोटोनोइड्स असतात, टोमॅटो मध्ये लायकोपीन असते तर बीट मध्ये अँथो सायनीन .
गोकर्ण किंवा अपराजिता याचा एक सूंदर निळा जांभळा रंग असतो.
या मधून मिळणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्स मुळे शरीरातील इन्फलमेशन वा दाह कमी होतो तसेच ते त्वचा आणि केस यासाठी देखील चांगले असते.
यामुळे ताण कमी होतो आणि मूड देखील चांगला राहतो.
फुलांचे अर्क आणि त्याचे संशोधन काही नवीन नाही.
डॉक्टर बाख यांची देखील फुलांचे अर्क आणि त्याचे आपल्या मानसिक स्तिथी वर होणारे परिणाम याबद्दल खूप अभ्यास केला आहे.
(छायाचित्र : गुगल)
या फुलांचा चहा करताना त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या एकदा धुवून घ्यावा आणि वरून गरम पाणी टाकून १० ते १५ मिनिटे हे झाकून ठेवावे आणि मग गाळून प्यावे.
आपण यासाठी ताजी किंवा सुकलेली फुले देखील वापरू शकतो. यात लिंबू पिळले तर याचा रंग अजून गहिरा होतो आणि कधी आपण आपल्या गरजेनुसार आणि आरोग्या नुसार थोडे मध देखील यात टाकू शकतो.
याचे बरेच फायदे आहेत
यात catechins आहेत त्यामुळे वजन कमी करायला किंवा पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते.
(छायाचित्र : गुगल)
यात अँटी ऑक्सिडंट्स असल्याने हे कर्करोगापासून आपला बचाव करू शकतात. यात अँथोसायनीन 3 असल्याने ते केसांच्या वाढीसाठी चांगले असतात तसेच त्वचा चांगली ठेवतात आणि म्हणूनच यांचा एक फायदा अँटी एजिंग म्हणजे तारुण्य राखण्यासाठी म्हणून सांगितला जातो. हे हृदयविकार, कोलेस्टेरॉल यापासून आपला बचाव करू शकतात आणि आपला ताण कमी करून मूड चांगला राहण्यासाठी मदत करतात.
हे पूर्णपणे टॅनिन फ्री आणि केफिन फ्री असल्याने ज्यांना चहा कॉफी सोडायची आहे त्यांना तो उत्तम आहे. तर मग करुन पहा हा गोकर्णाचा सुंदर निळा चहा.
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)