जर आपण मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, कमकुवत दृष्टी, स्मरणशक्ती कमी, सांधेदुखी, पाठदुखी, आळस, थकवा किंवा कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर, हे वजन वाढीचे लक्षण असू शकते (Weight Loss Tips). लठ्ठपणा या समस्यांना कारणीभूत आहे. मुख्य म्हणजे बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वजन झपाट्याने वाढत जाते (Fitness). त्यामुळे वेळीच वाढलेल्या वजनाकडे लक्ष देऊन कमी करायला हवे.
जर आपल्याला व्यायाम आणि योगा करण्यास वेळ मिळत नसेल तर, न्यूट्रिशनिस्ट डॉ. शिखा सिंग यांनी सांगितलेली एक गोष्ट करून पाहा. यामुळे आपले १० किलोपर्यंत वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. यासाठी आपल्याला आहारात एक ग्लास दुधी भोपळ्याच्या रसाचा समावेश करायला हवा. यामुळे आपले लवकर वजन कमी होईल(Bottle Gourd - How it Helps in Weight Reduction?).
दुधी भोपळ्याचा रस पिण्याचे फायदे
पोषणतज्ज्ञांच्या मते, 'दुधी भोपळ्यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. त्यात लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील आढळतात. यातील पौष्टीक घटकांमुळे वेट लॉससाठी मदत होते.'
किचनमधले कंटेनर - तेलाचे डबे मेणचट झालेत? ३ ट्रिक्स - न घासता, न रगडता डबे होतील स्वच्छ
पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाय
दुधी भोपळ्याचा रस अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने परिपूर्ण असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यात ९२ टक्के पाणी असते. हे यकृत डिटॉक्सिफाय करते. शिवाय त्वचा आणि केसांना हायड्रेट ठेवते.
पचनशक्ती मजबूत करण्यास मदत
खराब पचनामुळे पोटाचे विकार तर वाढतात. शिवाय वजनही वाढते. हळूहळू अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आपण दुधी भोपळ्याचा रस पिऊ शकता. यामुळे वेट लॉस करणे सोपे होईल.
दुधी भोपळ्याचा रस कसा तयार करायचा?
ICMR सांगते पाणी पिण्याची योग्य पद्धत; चुकीच्या पद्धतीने प्यायले तर हाडं होतील ठिसूळ आणि..
- दुधी भोपळा चवीला कडू असेल तर, ते खाणं टाळा.
- आता दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या. त्याचे तुकडे करा. ज्यूसरमध्ये घालून त्याचा रस तयार करा.
- या रसात थोडे काळे मीठ घाला.
- यानंतर लिंबाचा रस मिसळून सेवन करा.