Join us  

'हेल्दी' असतो म्हणून ब्राऊन ब्रेड खात असाल तर ३ गोष्टी लक्षात ठेवा- वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 5:07 PM

Brown bread or multigrain bread is really healthy?: हेल्दी असतो म्हणून अनेक जण व्हाईट ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड खातात.... बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत.

ठळक मुद्देब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड व्हाईट ब्रेडपेक्षा जास्त पौष्टिक असतात का? बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत

हल्ली बऱ्याच जणांचा सकाळता नाश्ता हा ब्रेड- बटर टोस्ट, ब्रेड- जॅम किंवा सॅण्डविच असा असतो. हा ब्रेडचाच नाश्ता पण तो ही अधिक पौष्टिक व्हावा, यासाठी अनेक जण खास व्हाईट ब्रेड आणण्याऐवजी ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड आणतात (Brown bread or multigrain bread is really healthy?). कारण व्हाईट ब्रेड हा मैद्याचा असतो. त्यापेक्षा गव्हापासून तयार झालेला ब्राऊन ब्रेड किंवा वेगवेगळ्या धान्यांपासून बनलेला मल्टीग्रेन ब्रेड खाणं अधिक पौष्टिक असतं, असं आपण ऐकत आलो आहोत (difference between brown bread and white bread). पण खरंच ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड व्हाईट ब्रेडपेक्षा जास्त पौष्टिक असतात का? बघा याविषयी आहारतज्ज्ञ नेमकं काय सांगत आहेत (experts opinion about brown bread)....

 

तुम्हीही हेल्दी असतो म्हणून नाश्त्याला ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड खात असाल तर त्याविषयीच्या या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच पाहिजेत.

कपड्यांना इस्त्री केली नाही म्हणून १२ वर्षांचा मुलगा आईवर ओरडला- म्हणून त्याच्या बाबांनी काय केलं पाहा....

याविषयीचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ dieticianricha2095 या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आहारतज्ज्ञ असं सांगत आहेत की तुम्ही व्हाईट, ब्राऊन किंवा मल्टीग्रेन असा कोणत्याही प्रकारचा ब्रेड आणला तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात मैदा असतोच. त्यामुळे मैदा टाळायचा असेल तर ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड खाणं बंद करायला पाहिजे.

 

दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा ब्रेड करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात साखर आणि तेल वापरलेलं असतं.

प्लास्टिकच्या खुर्च्या काळपट झाल्या- डाग पडले? करा २ सोपे उपाय- खुर्च्या होतील नव्यासारख्या चकाचक 

त्यामुळे जेव्हा तुम्ही हेल्दी समजून ब्राऊन किंवा मल्टीग्रेन खाता, तेव्हा त्याच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात साखर आणि तेल तुमच्या पोटात जातं. जे तब्येतीसाठी चांगलं नाही.

 

तिसरा मुद्दा म्हणजे आपण गव्हाची पोळी जेव्हा घरी करतो, तेव्हा तिचा रंग ब्राऊन ब्रेडसारखा चॉकलेटी दिसत नाही.

मुलं ऐकतच नाहीत, हट्टीपणा करतात- उलटून बोलतात? फक्त १ उपाय करा- मुलांचा स्वभाव बदलेल

यामागचं कारण असं आहे की ब्राऊन ब्रेड तयार करताना त्यात भरपूर प्रमाणात कॅरेमल कलर घातलेले असतात. हे कलर कॅन्सरचा धोका निर्माण करतात. त्यामुळे यापुढे कधीही हेल्दी म्हणून ब्राऊन किंवा मल्टीग्रेन ब्रेड खात असाल तर हे ३ मुद्दे लक्षात ठेवा. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सकर्करोग