'जिममध्ये काय जातेस, घरातली थोडी कामं कर वजन कमी होईल', हे वाक्य आपण घरातल्या व्यक्तींकडून ऐकलीच असेल. पण खरंच घरातली कामं करून वजन कमी होते का? वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी लोकं जिम किंवा योगभ्यास करतात. परंतु, आपण घरातली कामं करूनही कॅलरीज बर्न करू शकतात.
होम क्लिनिंग सर्व्हिस कंपनी होमग्लोने केलेल्या अभ्यासानुसार, 'घराची साफसफाई केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते. यासाठी कंपनीने 10 व्यावसायिक क्लिनर्सना पाच घरे स्वच्छ करण्यासाठी पाठवले, त्यांना हातात फिटबिट घालण्यास सांगितले. त्यानंतर प्रत्येक खोली साफ करताना त्यांनी किती कॅलरी बर्न केले, याचे विश्लेषण करण्यात आले''(Burn More Calories While Cleaning Your House).
घरातली सफाई केल्याने बर्न होऊ शकतात इतके कॅलरीज
अभ्यासात असे आढळून आले की, जेव्हा सफाई कामगारांनी वन बीएचके घराची सफाई केली, तेव्हा त्यांनी एकूण ८३० कॅलरीज बर्न केले. थ्री बीएचके खोलीची सफाई करताना १,३११ कॅलरी बर्न झाल्या. दीड तासांच्या वर्कआउटमध्ये आपण जितके कॅलरीज बर्न करतो, त्याच्या तुलनेत सफाई करताना जास्त बर्न होतात असे दिसून आले.
घरात मुंग्यांचा सुळसुळाट? टॅलकम पावडरचा करा असा वापर, ५ मिनिटात मुंग्या होतील छूमंतर
स्वयंपाकघर स्वच्छ केल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात
डेटानुसार, स्वयंपाक घर साफ करताना व्यावसायिक क्लिनर्सने जास्त कॅलरीज बर्न केले. यावेळी सरासरी २७६ कॅलरीज बर्न झाल्या, ४० मिनिटं जॉगिंगच्या तुलनेत स्वयंपाकघर साफ करताना जास्त कॅलरीज बर्न होतात.
खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?
कॅलरी बर्न करण्यासाठी स्वयंपाकघर अशा प्रकारे स्वच्छ करा
अभ्यासात असे निदर्शनास आले की, ''जर आपण दररोज स्क्रबिंग आणि मॉपिंगच्या मदतीने सफाई केली, तर जास्त कॅलरीज बर्न होऊ शकतात. स्वयंपाकाची तयारी करताना वापरण्यात येणारी भांडी, वापरून झाल्यानंतर लगेच घासून काढा. मसाल्यांचे डबे नियमित घासा. जेवण करून झाल्यानंतर गॅस शेगडी साफ करा. किचनमधील टाईल्स देखील नियमित साफ करा.