ब्रेडला, पोळीला तूप लावणे, बटर लावणे हे तर आपल्याला माहितीच आहे. बऱ्याचदा अनेक आयुर्वेदिक उपचारांमध्ये दुधात लोणी, तूप टाकून पिण्याचा सल्लाही दिला जातो. आता असाच प्रयोग कॉफीसोबत करून बघा... आपली नेहमीसारखी कॉफी करा आणि त्यात लोण्याचा गोळा टाका.. या बटरी कॉफीची चव तर निश्चितच वेगळी लागेल, पण याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात, असं काही फूड एक्सपर्ट सांगतात.
कॉफीमध्ये बटर टाकून पिण्याचे फायदे
१. पचनासाठी उत्तम (digetion)
पचन क्रियेचे काम उत्तम व्हावे यासाठी रात्री झोपताना गरम दूधात बटर टाकून पिण्याचा सल्ला दिला जातो. कॉफीसोबत देखील तुम्ही हा प्रयोग करू शकता. फक्त हा प्रयोग रात्री न करता दिवसा करावा. नाश्ताच्या वेळी अशी कॉफी घेतली तर अधिक उत्तम. एक कप कॉफीमध्ये थोडासा बटरचा तुकडा टाका आणि अशी गरमागरम कॉफी प्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. पोट बिघडल्यास असा उपचार करायला हरकत नाही.
२. मानसिक ताण कमी होते (depression)
अनेकदा काही कारणावरून खूपच डिप्रेस वाटत असेल, मन उदास असेल किंवा नैराश्य आल्यासारखे वाटत असेल तर अशी बटरी कॉफी पिऊन बघा. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे मनाचा थकवा दूर होतो, फ्रेश वाटते, हे तर आपण जाणताेच. आता या कॉफीत जर बटर किंवा लोणी टाकून घेतले तर त्याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होते.
३. हृदयासाठी चांगले (good for heart)
बटरी कॉफी ही आपल्या हृदयासाठी चांगली असते. बटरी कॉफी घेतल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टरॉल कमी होण्यास मदत होते. बॅड कोलेस्टरॉलची पातळी घटली की हृदयाचे काम आणखी जोमात चालते. त्यामुळे आठवड्यातून एकदा अशी कॉफी घेण्यास हरकत नाही.
कशी बनवायची बटर टाकून कॉफी?
How to make coffee with butter?
अशी कॉफी बनविण्यासाठी एक कप दूध उकळायला ठेवा. त्यात साखर टाका. तुमच्या कपात तुम्हाला पाहिजे तेवढी कॉफी पावडर टाका. आता दुध उकळायला आले की त्यात बटर किंवा लोणी टाका. ते व्यवस्थित हलवून घ्या. मग हे दूध कॉफी टाकलेल्या कपात ओता. चमच्याने कपातले दूध आणि कॉफी व्यवस्थित हलवून घ्या. झाली बटर टाकलेली कॉफी तयार.