Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

Buttermilk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 11:30 AM2024-07-31T11:30:48+5:302024-07-31T15:15:32+5:30

Buttermilk For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

Buttermilk For Weight Loss : Does Buttermilk Help In Weight Loss Dr Exploring The Facts | रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

रोज ताक प्यायल्यानं वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात, ताकाचा शरीरावर काय परिणाम होतो

लटकलेलं पोट,  मांड्या-दंडावर जमा झालेली चरबी पाहिल्यानंतर व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. यामुळे अनेक आजाराही उद्भवू शकतात. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम, योगा आणि डाएटिंग करतात. पण इतकं करूनही फारसा फरक दिसत नाही. त्यांचे वजन जसंच्या तसंच दिसतं. 
भरपूर प्रयत्न केल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर याची अनेक कारणं असू शकतात. (Buttermilk For Weight Loss)

जर तुम्ही वेगाने वजन कमी करण्याची  प्लॅनिंग करत असाल तर आहारात ताकाचा समावेश करू शकता. (Buttermilk For Weight Loss) ताकात अनेक पोषक तत्व अतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म  बुस्ट होण्यास मदत होते. (Weight Loss Secret) वजन कमी करण्यासाठी ताकाचे सेवन बरेच फायदेशीर ठरते. (Does Buttermilk Help In Weight Loss Dr Exploring The Facts)

ताकातील पोषक तत्व

ताकात भरपूर प्रोटीन्स, फायबर्स आणि कॅल्शियम, सोडियम आणि व्हिटामीन बी-१२ असते. नियमित ताकाचे सेवन केल्याने पोट आणि आतड्यांच्या समस्या उद्भवत नाहीत. ताकावर झालेल्या रिसर्चमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार लॅक्टोज आणि मिल्क प्रोटीन कॅसिइन यात असते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

वजन कमी करण्यासाठी ताक कसे प्यावे?

वजन कमी करण्यासाठी ताक फायदेशीर मानले जाते. ताकात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याच्या सेवन सकाळी नाश्ता किंवा लंचसाठी करू शकता. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं वाटतं, तुम्ही ओव्हरइटींग करत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होते. ताकाच्या सेवनाने कोलेस्टेरॉल आणि बॅड फॅट कमी होण्यास मदत होते.

शिळ्या चपात्यांपासून ५ मिनिटांत करा चमचमीत चपातीचे कुटके; सोपी रेसिपी-१ कणही वाया जाणार नाही

ताकात व्हिटामीन्स आणि प्रोबायोटिक्स असतात. त्यामुळे शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होते. अनेकदा  वजन वाढणं मेटाबॉलिझ्म कमी होण्यामुळे होतं. ताकाचे सेवन केल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. मेटाबॉलिझ्म बुस्ट झाल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. 


वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी ताकाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. ताकातील पोषक तत्व पचनक्रिया मजबूत ठेवण्याचं काम करतात. यातील प्रोबायोटिक्स आतड्यांच्या विकासात मदत करतात.  जे लोक  सकाळी ताकाचे सेवन करत नाही ते नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर याचे सेवन करू शकतात. वजन कमी करण्यासाठी ताकाचे सेवन रात्री करू नका. आयुर्वेदानुसार ताकाचे सेवन रात्री केल्यानं पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात. 

दिवसभरात भरपूर चालणं होतं तरी पोट सुटतंय? चालताना १ गोष्ट करा, भराभर घटेल वजन

ताक कसे बनवावे? (How To Make Buttermilk For Weight Loss)

बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे ताक उपलब्ध आहेत पण बाजारात मिळणारं ताक वेगवेगळ्या प्रोसेसमधून तयार होतं. त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत. अशा स्थितीत तुम्ही ताक घरीच बनवू शकता. ताक बनवण्यासाठी  1 कप साधं दही,  हिरवी मिरची, काळं मीठ, कोथिंबीर, जीरं पावडर आणि चाट मसाला घ्या. नंतर यावर बर्फ घाला. ताजं ताक बनून तयार होईल.

Web Title: Buttermilk For Weight Loss : Does Buttermilk Help In Weight Loss Dr Exploring The Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.