Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल

वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल

Can Coconut Oil Help You Lose Weight? खोबरेल तेल फक्त स्किन आणि केसांसाठी फायदेशीर नसून, वजन देखील कमी करण्यास मदत करते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 03:22 PM2023-08-23T15:22:31+5:302023-08-23T15:27:38+5:30

Can Coconut Oil Help You Lose Weight? खोबरेल तेल फक्त स्किन आणि केसांसाठी फायदेशीर नसून, वजन देखील कमी करण्यास मदत करते

Can Coconut Oil Help You Lose Weight? | वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल

वाढलेलं वजन - बेली फॅट कमी करायचंय? खोबरेल तेलाचा करा आहारात समावेश - वजन झरझर घटेल

आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. ही गोष्ट सर्वांनाच ठाऊक आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकं वेळेवर खात - पीत नाही. ज्यामुळे आहारात पौष्टीक घटकांची कमतरता भासते. या करणामुळे शरीर कमजोर होते, व आजार आपल्या भोवती घेराव घालतात. त्यामुळे तज्ज्ञ घरचे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. भारतीय पद्धतीने स्वयंपाक करताना तेलाचा वापर होतोच. आपण आहारात कोणतं तेल वापरत आहोत, यावर देखील आपले आरोग्य कसे राहेल हे डिपेंड आहे.

काही तेलाच्या वापरामुळे आपले वजन वाढते. वजन वाढलं की, गंभीर आजार निर्माण होतात. पण खोबरेल तेलाने वजन कमी होते असे म्हटले जाते. खरंच खोबरेल तेलाने वजन कमी होते का? वजन कमी करण्यासाठी आहारात खोबरेल तेलाचा वापर कसा करावा? यासंदर्भात, मायउपचार या वेबसाईटला माहिती देताना डॉक्टर आयुष पांडे यांनी माहिती दिली आहे(Can Coconut Oil Help You Lose Weight?).

खोबरेल तेलाचे फायदे

खोबरेल तेल आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. खोबरेल तेलाचा आहारात समावेश केल्याने ब्लड शुगर नियंत्रित राहते. यातील औषधीय गुणधर्म शरीराला पोषक तत्व प्रदान करतात. खोबरेल तेल वजन कमी करण्यासही मदत करते.

उपाशी राहिल्याने पोटावरची चरबी लवकर कमी होते, वजन घटते का? 'फास्टिंग' करणे किती फायद्याचे..

नारळाच्या तेलात नैसर्गिकरित्या मिडीयम चैन ट्रायग्लिसराइड म्हणजेच एमसीटी असते, जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. याशिवाय त्यात इतरही अनेक प्रकारचे फॅट्स असतात. जे लोकं वेट लॉस करीत आहेत, त्यांनी आपल्या आहारात नारळाच्या तेलाचा समावेश करावा.

खोबरेल तेलामुळे खरंच वजन कमी होते का?

खोबरेल तेलात असलेली एमसीटी, वजन कमी करण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मदत करते. अनेक साऊथ इंडियन लोकं आहारात खोबरेल तेलाचा वापर करतात. नियमित खोबरेल तेलाचा आहारात समावेश केल्याने, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह हृदय देखील निरोगी राहते.

प्रोटीन हवं ना ४ शाकाहारी गोष्टी खा, वाढेल काम करण्याची ऊर्जा! सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात..

आहारात खोबरेल तेलाचा समावेश करण्याचे फायदे

लो कार्ब्ज फूड

बरेच आहारतज्ज्ञ लो कार्ब्ज फूड खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, नारळात दाहक-विरोधी गुणधर्म आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते. ज्यामुळे सामान्य तेलापेक्षा खोबरेल तेल वजन नियंत्रित ठेवण्यास अधिक फायदेशीर ठरते.

क्रेविंग्स कमी करते

आहारात खोबरेल तेलाचा समावेश केल्याने भूक नियंत्रित राहते. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅट्सचा समावेश असल्यानं, भूक कमी लागते. जे लोकं नियमित स्वरुपात नारळाच्या तेलाचा आहारात समवेश करतात, त्यांच्यामध्ये खाण्याची इच्छा कमी होते.

चयापचय बुस्ट करते

नारळातील फॅटी अॅसिड्स चयापचयची गती बुस्ट करते. फास्ट मेटाबॉलिज्ममुळे शरीरातील अतिरिक्त चरबी सहजरित्या कमी होते. यासह पचनसंस्था देखील मजबूत होते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते. व वजन देखील कमी होते.

बेली फॅट कमी करते

खोबरेल तेलाचा आहारात समावेश केल्याने भूक कमी लागते. यासह चयापचयची गती वाढते. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा आहारात समावेश करा. बेली फॅट कमी झाल्याने मेटाबॉलिक हेल्थ सुधारते. यासह जुनाट आजारांपासून सुटका होते.

लिंबू जास्त खाल्ल्याने खरेच वजन कमी होते का? लिंबू आहारात किती असावा?

आहारात कसा करावा खोबरेल तेलाचा वापर?

- खोबरेल तेलाचा वापर आपण कुकिंग ऑइल म्हणून करु शकता.

- खोबरेल तेलाचा वापर आपण कॉफी, चहा, आणि स्मुदीमध्ये अॅड करून करू शकता.

- बेली फॅट कमी करण्यासाठी, आपण सकाळी कोमट पाण्यात खोबरेल तेल मिक्स करून पिऊ शकता.

Web Title: Can Coconut Oil Help You Lose Weight?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.