Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : नाश्ता करणं टाळल्यामुळे शरीरात मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता भासू शकते जी अनेक आजारांचे कारण ठरते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:50 PM2024-11-12T16:50:47+5:302024-11-12T18:42:25+5:30

Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : नाश्ता करणं टाळल्यामुळे शरीरात मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता भासू शकते जी अनेक आजारांचे कारण ठरते.

Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : What Happens To Your Body When You Skip Breakfast | नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

नाश्ता करणंच बंद केलं तर वजन खरंच पटकन कमी होतं? आहारतज्ज्ञ सांगतात, वेट लॉससाठी हेच योग्य की..

सकाळचा नाश्ता नाही केला म्हणजे आपण कमी खाणार, फक्त २ वेळेस जेवायचं नाश्ता नाही केला तरी  चालेल असा अनेकांचा समज असतो. फिट, मेंटेन राहण्यासाठी तुम्ही सकाळी नाश्ता सोडण्याच्या विचारात असाल तर याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो.  चांगली फिगर मिळवळण्यासाठी नाश्ता सोडण्याची चूक कधीच करू नये. नाश्ता करणं टाळल्यामुळे शरीरात मायक्रोन्युट्रिएंट्सची कमतरता भासू शकते जी अनेक आजारांचे कारण ठरते. मेटाबॉलिक डिसॉर्डरमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. (What Happens To Your Body When You Skip Breakfast)

जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी एंड मेटाबॉलिझ्म ऑफ द एंडोक्राइन सोसायटीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात दिसून आलं की एक हेवी नाश्ता आणि चांगलं रात्रीचं जेवण तुम्हाला फिट आणि  तरूण दिसण्यासाठी मदत करू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि हाय ब्लड शुगरचा धोका टाळता येतो. (Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts)

आहारातज्ज्ञ इतु छाबडा सांगतात की, ''जर तुम्हाला असं वाटतं की नाश्ता सोडल्यानं वजन कमी होतं तर असं अजिबात नाही. ब्रेकफास्ट म्हणजे रात्रभर तुम्ही काही खाल्लेले नसते. रात्रीचा फास्ट तुटायला हवा.  हे दिवसाचं सगळ्यात महत्वाचं अन्न आहे.  ज्यामुळे तुमच्या शरीराला इंधन मिळते आणि दिवसभर काम करण्याची उर्जा राहते.  नाश्ता पोटभर करायला हवा आणि आहारात अशा पदार्थांचा समावेश करा  ज्यातून मॅक्रोन्युट्रिएंट्स मिळतील.

नाश्ता करणं का गरजेचं आहे?

जेव्हा आपण रात्रीचं जेवण करून झोपतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ तासांचे फास्टींग करतो तेव्हा शरीराला खाण्याची आवश्यकता असते जेणेकरून शरीरात एनर्जी राहील. तुम्ही नाश्त्याला काय खाता यावर तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार ते अवलंबून असते.  ज्यामुळे तुम्हाला उर्जावान आणि हेल्दी राहता येईल.

नाश्ता करणं सोडल्यावर शरीरावर काय परिणाम होतो?

आजकाल जीवनशैली अशी झाली आहे बऱ्याच गोष्टींकडे आपलं लक्ष नसते. कामाच्या ताण-तणावामुळे खाणंपिणं बिघडलं आहे. यामुळे लोक नाश्ता करणं सोडून देतात. त्यांना असं वाटतं की नाश्ता सोडल्यामुळे वेगानं वजन कमी करण्यास मदत होते. असे लोक नाश्त्याला फळं, सॅलेड आणि स्मूदी घेऊ शकतात. ज्यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासत नाही.

नाश्ता करणं सोडल्यामुळे मेटाबॉलिक रेट कमी होतो

खासकरून जेव्हा तुम्ही सकाळचा नाश्ता स्किप करता  तेव्हा तुमचा मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो, ज्यामुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही खूप कमी कॅलरीज घेत असाल तर मेटाबॉलिक रेट स्लो होतो. नाश्ता करणं सोडल्यामुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. इम्यूनिटी कमी होते. सेल्स डॅमेज होतात. शरीराला आजारांशी लढण्यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. जर तुम्ही एक वेळची पोषक तत्व कमी घेतली तर याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Can i Skip Breakfast And Lose Weight By Experts : What Happens To Your Body When You Skip Breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.