Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात..

डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात..

Can mangoes make you fat : आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का, किती प्रमाणात खाल्ल्यास आंबा बाधत नाही, आंबा खाल्ल्यानं शुगर लेव्हल वाढते का. असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:38 AM2023-04-25T09:38:00+5:302023-04-25T15:31:12+5:30

Can mangoes make you fat : आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का, किती प्रमाणात खाल्ल्यास आंबा बाधत नाही, आंबा खाल्ल्यानं शुगर लेव्हल वाढते का. असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात.

Can mangoes make you fat : Know can eating mangoes lead to weight gain or not and benefits | डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात..

डायबिटीक व्यक्तींनी आंबा खाल्ला तर चालतो की आंबा खाल्ल्यानं शुगर वाढते? तज्ज्ञ सांगतात..

उन्हाळ्याच्या दिवसात आंबे आवडीनं खाल्ले जातात. आंबे खायला आवडत नाहीत असा एकहीजण सापडणार नाही. फळांचा राजा आंबा बाजारात येण्याची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गरमीच्या दिवसात प्रत्येकाच्याच घरी आंब्याचा रस, आंबा बर्फी, आंब्याच सरबत असे पारंपारीक पदार्थ बनवले. (Does mango make you fat) फळांमध्ये नैसर्गिक साखर असते.  साखरेला पर्याय म्हणून फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.

 आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का, किती प्रमाणात खाल्ल्यास आंबा बाधत नाही, आंबा खाल्ल्यानं शुगर लेव्हल वाढते का. असे अनेक प्रश्न लोकांना पडलेले असतात. आहारतज्ज्ञ रिचा डोशी यांनी आपल्या इंस्टाग्रामपोस्टवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे.  (Can eating mangoes lead to weight gain)

आंबा खाल्ल्यानं वजन वाढतं का?

आंबे खाल्ल्यानं सरसकट वजन वाढत नाही कारण आंब्याच्या आकारानुसार त्यात अंदाजे 120 ते 180 कॅलरीज असतात. आंबा खाणं अगदी उत्तम ठरतं आणि तुम्ही त्याचा आनंद अगदी बिंधास्त घेऊ शकता. आंब्यामध्ये कोलेस्टेरॉल कमी आणि फॅट्सही कमी असते. म्हणून, ते खाण्यासाठी सुरक्षित आहे. आंब्यामुळे तुमचे वजन वाढत नाही.

डायबिटीस असल्यास आंबे खाऊ शकतो का?

डायबिटीस असलेल्या लोकांना असं वाटतं की ते आंब्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. मात्र, तसे होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. जर योग्य प्रमाणात आंबे खाण्याचा आनंद घेतला तर अजिबात साखर वाढत नाही.  आंबा कमी GI  असलेले (ग्लायसेमिक इंडेक्स) फळ आहे त्यांचा GI फक्त 51 आहे. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक आणि मधुमेहीसुद्धा आंबा खाण्याचा आनंद घेऊ शकतात. हे अगदी सुरक्षित आहे.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. यामुळे हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे तुमची दृष्टी वाढवायची असेल तर आंबा नक्की खा.  आंब्यामध्ये अनेक प्रकारचे एन्झाइम्स असतात. हे एन्झाइम अन्नाचे  कण तोडण्याचे काम करतात, ज्यामुळे ते अन्न पचण्यास मदत करतात.

Web Title: Can mangoes make you fat : Know can eating mangoes lead to weight gain or not and benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.