Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

Can we eat multi grains roti daily : दोन पेक्षा जास्त पीठांचा समावेश असल्यास त्या पीठाला मल्टीग्रेन असं म्हणतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 03:20 PM2023-10-13T15:20:57+5:302023-10-13T15:29:55+5:30

Can we eat multi grains roti daily : दोन पेक्षा जास्त पीठांचा समावेश असल्यास त्या पीठाला मल्टीग्रेन असं म्हणतात.

Can we eat multi garain roti daily multigrain atta benefits and side effects | रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

रोजच्या जेवणात साधी चपाती खावी मल्टीग्रेन चपाती? आहारतज्ज्ञ सांगतात हे खाण्याचे फायदे-तोटे

भारतात प्रत्येकाच्याच घरी गव्हाच्या चपात्या बनवल्या जातात. पण गव्हात ग्लुटेन असते म्हणून अनेकजण चपात्या खाणं टाळतात आणि मल्टीग्रेन चपात्या खातात. बाजारातही मल्टीग्रेन भाकऱ्या, चपात्यांचे पीठ सहज उपलब्ध होते. यात बाजरी, नाचणी, चणे, गहू,  ज्वारी, शिंगाड्याच्या पिठाचा समावेश आहे  याच्या सेवनाने तब्येतीला फायदे मिळतात तसंच नुकसानही होऊ शकतं. (Weight Loss Tips)

डायटिशियन आरती सिंगल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या खाणं काही नवीन ट्रेंड नाही. गहू आपल्या रोजच्या जेवणाचा भाग आहे. ( Can we eat multi grains roti daily) बाजरी, मक्का, चणे या धान्यांच्या चपात्या खाल्ल्या जातात.  गव्हाच्या पीठात चण्याचे किंवा इतर पीठ मिसळून चपात्या बनवण्याचा ट्रेंड खूपच जुना आहे. (Health Can we eat multigarain roti daily multigrain atta benefits and side effects)

दोन पेक्षा जास्त पीठांचा समावेश असल्यास त्या पीठाला मल्टीग्रेन असं म्हणतात.  यात वेगवेगळे एंजाईम्स असतात. प्रत्येक टाईपचं अन्न खाण्याची योग्य पद्धत ठरलेली असते.  हे समजून न घेता मल्टीग्रेन पीठांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास तब्येतीला नुकसान पोहोचू शकतं. 

मल्टिग्रेन रोटी रोज खाता येते का?

मल्टिग्रेन रोटी रोज खाणं योग्य नाही. यात अनेक प्रकारचे सिड्स आणि ग्रेन्स असतात.  जे  आजारी असल्यानंतर खाणं टाळलं जातं. यात भरपूर कॅल्शियम असते. याव्यतिरिक्त फॉस्फरेस, गव्हात कार्बोहायड्रेट्स, चण्यात प्रोटीन्स आणि जिंक, बाजरीत जास्तीत जास्त आयर्न असते. एकत्रितरित्या हे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रियेत व्यत्यय येऊ  शकतो.  पोटाच्या समस्या होतात. 

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे रोज खा, भरपूर कॅल्शियम मिळेल

थायरॉईड डायबिटीस असल्यास अधिक काळजी घ्यायला हवी

असे अनेक पदार्थ आहेत जे थायरॉईडच्या रुग्णांना खाण्यास मनाई असते. खासकरून बाजरी, नाचणी थायरॉईडच्या रुग्णांना न खाण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीसचे रुग्ण मल्टीग्रेट खाऊ शकतात. फक्त त्यात गव्हाचा समावेश करू शकतात. प्रत्येक आजारानुसार तज्ज्ञांकडून विशेष सल्ला घेणं गरजेचं आहे.

जर मल्टीग्रेनमध्ये कन्फ्यूज असाल तर इतर पदार्थांमध्ये याचा वापर करू शकता. ही एक उत्तम कल्पना आहे की सर्व पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने  खा. आठवड्यातून २ दिवस गव्हाची चपाती, एक दिवस मक्याची चपाती नंतर बाजरी, ज्वारी, जवसाची भाकरी अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे डायजेशन चांगले राहील.

Web Title: Can we eat multi garain roti daily multigrain atta benefits and side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.