Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला 

खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला 

How To Avoid Excess Eating: सणासुदीच्या दिवसांत तर असा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो आणि मग गोडधोड खाऊन पटापट वजन वाढतं (How to control weight gain?). असं होऊ नये, त्यासाठीच तर वाचा तज्ज्ञांचा हा खास सल्ला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 03:41 PM2022-08-31T15:41:56+5:302022-08-31T15:43:04+5:30

How To Avoid Excess Eating: सणासुदीच्या दिवसांत तर असा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो आणि मग गोडधोड खाऊन पटापट वजन वाढतं (How to control weight gain?). असं होऊ नये, त्यासाठीच तर वाचा तज्ज्ञांचा हा खास सल्ला.

Can't control yourself while eating? 4 simple tips by diet experts about portion control | खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला 

खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला 

Highlightsस्मार्ट पद्धतीने कसं खावं, जेणेकरून खाण्यावर आपोआपच नियंत्रण येईल, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

आपले नावडते किंवा खूप काही आवडणारे पदार्थ जोपर्यंत आपल्या समोर नसतील, तोपर्यंत काही चिंता नसते. आपण आपल्या जिभेवर व्यवस्थित ताबा ठेवू शकतो. पण जेव्हा आवडते पदार्थ समोर येतात, तेव्हा मात्र ताबा सुटतो आणि आपण भरपेट जेवतो. एखाद्या पदार्थाची चव भारीच आवडून गेल्यावर किंवा सणासुदीच्या दिवसांत सगळं मिष्टान्न आणि सुग्रास भोजन समोर आल्यावर तर हमखास डाएटिंग (dieting) वगैरे सगळं विसरलं जातं. कधी कधी असं होणं साहजिक आहे. पण वारंवार असं होत असेल तर स्मार्ट पद्धतीने कसं खावं (4 tips for controlling excess eating ), जेणेकरून खाण्यावर आपोआपच नियंत्रण येईल, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

 

ऋजुता यांनी नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये त्यांनी पोर्शन कंट्रोल (portion control while eating) या विषयावर भाष्य केले आहे. पोर्शन कंट्रोल म्हणजे आपल्याला बरोबर आपली खाण्यापिण्याची मर्यादा सांभाळता येणं आणि त्यानुसार गरजेपुरताच आहार पोटात घेणं. ऋजुता म्हणतात की पोर्शन कंट्रोल करता येणं ही अवघड गोष्ट आहे. कारण पाेर्शन कंट्रोल करणं हे आपल्या सवयी, झोप, आरोग्य, आपण का खातो आहोत त्यामागचं कारण अशा सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून पोर्शन कंट्रोल करता येत नसेल, तरी अति खाणं होऊ नये म्हणून बरोबर पद्धतीने खाणं तर आपण नक्कीच करू शकतो. त्यासाठीच ऋजुता यांनी या काही टिप्स शेअर केल्या आहेत.

 

अति खाणं टाळण्यासाठी या ४ गोष्टी करा
१. जेवताना शांतपणे एका जागी बसा आणि त्यानंतरच जेवा.

२. जेवताना तुमचं सगळं लक्ष तुमच्या जेवणावर असावं. गप्पांच्या नादात किंवा टिव्ही, मोबाईल बघत बघत बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त जेवलं जातं.

३. जेवताना सावकाश जेवा. अजिबात घाई करू नका.

४. आठवड्यातून एकदा तरी असं जेवण करा की जे तुम्ही स्वत: तुमच्या हाताने केलेलं असेल.

 

 

Web Title: Can't control yourself while eating? 4 simple tips by diet experts about portion control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.