जेवणाची चव वाढवणारे मसाले प्रत्येक भारतीय घरात आपल्याला आढळेल (Elaichi Water). ज्यात छोट्याश्या वेलचीचा देखील समावेश आहे. वेलची फक्त मसालेदार नसून, गोड पदार्थाची देखील चव वाढवते (Weight loss). चहामध्ये वेलची घालताच, फक्कड चहा तयार होतो. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. ज्याचा फायदा निश्चितच आपल्या आरोग्यावर होतो. पण छोटीशी वेलची वेट लॉससाठी देखील मदत करू शकते, हे आपल्याला ठाऊक होते का?
सकाळी रिकाम्या पोटी वेलचीचं पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण वेलचीचं पाणी नेमकं कधी प्यावं? याचे फायदे किती? पाहूयात(Cardamom Water On Empty Stomach: 4 Amazing Health benefits).
वेलचीचं पाणी कशा पद्धतीने वेट लॉससाठी मदत करते ?
चयापचय वाढवण्यासाठी मदत
वेलची हा मसाला प्रत्येक स्वयंपाकघरात आढळते. जर आपल्याला मेटाबॉलिज्म बुस्ट करायचं असेल तर, हिरव्या वेलचीचं पाणी प्या. यातील गुणधर्म चयापचय क्रिया जलद करण्यास मदत करते. ज्यामुळे अधिक कॅलरीज आणि वेट लॉससाठी मदत होते.
रोज खा ४ पैकी १ पदार्थ, चष्मा लागणार नाही-डोळ्यांचा नंबर वाढण्यापूर्वी व्हा जाग
भूक नियंत्रणात राहते
मसाल्यामध्ये भूक नियंत्रित ठेवणारे गुणधर्म असतात. हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्याने आपल्याला अधिक काळ भूक लागत नाही. अशावेळी आपण अनावश्यक स्नॅकिंग टाळतो, आणि हेल्दी पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो.
पचन सुधारते
हिरव्या वेलचीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यातील गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी हिरव्या वेलचीचं पाणी प्यायल्याने पाचक रसांना चालना मिळते. जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
वेट लॉससाठी मदत
वेलचीचे पाणी प्यायल्याने पोटाच्या संबंधित समस्या दूर होतात, शिवाय वेट लॉससाठीही मदत होते. वेलचीचे पाणी शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. यामुळे वाढते वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत
वेलचीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो आणि हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.