Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी एक खास रेसिपी (recipe) नुकतीच शेअर केली आहे.. करून बघा हा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2023 07:09 PM2023-01-03T19:09:44+5:302023-01-03T19:10:27+5:30

Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी एक खास रेसिपी (recipe) नुकतीच शेअर केली आहे.. करून बघा हा प्रयोग

Celebrity chef Kunal Kapoor shared recipe for perfect weight loss drink | परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

परफेक्ट वेटलॉस ड्रिंक, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची खास रेसिपी, वजन झटपट कमी होईल

Highlightsज्यांना वजन वाढीची चिंता आहे, त्यांनी काही आठवडे हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 

वाढतं वजन कमी कसं करायचं, हा अनेकांपुढे पडलेला प्रश्न. कारण चुकीची जीवनशैली, बैठ्या कामाचं वाढलेलं स्वरुप आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आहारात झालेला बदल आणि व्यायामाला वेळ नसणे, यामुळे अनेक जण वाढत्या वजनामुळे त्रस्त झाले आहेत. तुम्हालाही वाढत्या वजनाची चिंता सतावत असेल तर रोजचा व्यायाम तर नियमित कराच, पण त्यासोबतच हा एक काढाही नियमितपणे घेत जा, असा सल्ला सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor shared recipe for perfect weight loss drink) यांनी दिला आहे. 

वेटलॉससाठी कसा करायचा काढा?
१. वजन कमी करण्यासाठी काढा कसा तयार करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

फक्त १५ ते २० रुपयांत संक्रांत वाण म्हणून लुटता येतील अशा १० उपयोगी वस्तू.. बघा काय आवडतं

२. यासाठी त्यांनी केवळ धने आणि पाणी या दोनच गोष्टी वापरल्या आहेत. शिवाय हा काढा तयार करण्याची कृतीही अगदीच सोपी आहे.

३. सगळ्यात आधी ६०० मिली पाणी एका भांड्यात घ्या. त्यात ४ टेबलस्पून धने टाकून ते अर्धा तास भिजू द्या.

 

४. अर्ध्या तासाने हे मिश्रण गॅसवर उकळायला ठेवा आणि मंद आचेवर १० ते १२ मिनिटे चांगले उकळू द्या.

५. त्यानंतर गॅस बंद करा. पाणी गाळणीतून गाळून घ्या आणि दररोज सकाळी हा गरमागरम काढा पिऊन दिवसाची सुरुवात करा.

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे खूपच वाढली? लावा ३ पदार्थांचा जादुई लेप, डार्क सर्कल्स होतील कमी

६. धने आणि पाणी असा नुसताच काढा जात नसेल तर त्यात चवीला म्हणून तुम्ही लिंबूही पिळू शकता. 

७. या काढ्याचं वर्णन कुणाल कपूर यांनी "perfect natural drink for weight loss and a healthy boost!" असं म्हणून केलं आहे. त्यामुळे ज्यांना वजन वाढीची चिंता आहे, त्यांनी काही आठवडे हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 

 

Web Title: Celebrity chef Kunal Kapoor shared recipe for perfect weight loss drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.