मनातल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी खूप शब्द खर्च करण्याची गरज नसते त्यासाठी एक गुलाबाचं फुल पुरेसं असतं. तसंच सौंदर्याच्या बाबतीतही त्वचेला फार काही लावायचं नसेल तर नुसतं गुलाब पाणी लावलं तरी त्वचा छान राहाते. त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यात मोलाची भर घालणारा गुलाब आरोग्यास फायदेशीर असतो. गुलाबाच्या पाकळ्यांवर प्रक्रिया करुन तयार केलेला गुलकंद शरीरातील उष्णतेचे आजार कमी करतो. आयुर्वेदात तर अनेक औषधं गुलकंदासोबत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण गुलाबावर कोणतीही प्रक्रिया न करता गुलाबाच्या नुसत्या पाकळ्या खाणंही (eating roses) आरोग्यदायी असतं असं शेफ संजीव कपूर (chef Sanjeev Kapoor) सांगतात. इंस्टाग्रामवरील आपल्या एका पोस्टमधून शेफ संजीव कपूर यांनी गुलाब खाण्याचे फायदे (benefits of eating roses) सांगितलेले आहेत.
Image: Google
गुलाब खाण्याचे फायदे
गुलाबाच्या नाजूक पाकळ्यात आरोग्यास लाभदायक पोषक मुल्यं असतात. गुलाबाच्या पाकळ्यात अ, क, ई ही जीवनसत्वं आणि लोह आणि कॅल्शियम ही खनिजं असतात. गुलाबाच फुल खाणं हे अनेकदृष्टीनं आरोग्यासाठी लाभदायक असतं.
1. घरातल्या आणि ऑफिसच्या कामानं येणारा ताण तणाव, नैराश्य, थकवा यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं. मानसिक दृष्ट्या अस्वस्थ वाटत असल्यास गादीवर गुलाबाच्या पाकळ्या पसरवून त्यावर झोपावं. गुलाबाच्या सुगंधानं मानसिक तणाव, नैराश्य कमी होतो. मायो क्लिनिकनं केलेल्या एका अभ्यासानुसार गुलाबाच्या फुलाचा वास घेतल्यानं मन शांत राहातं.
Image: Google
2. गुलाबाच्या पाकळ्यातील पोषक घटकांमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. गुलाबाच्या पाकळ्या नियमित सेवन केल्यास चयापचय क्रिया गतिमान होते. यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. गुलाबाच्या पाकळ्या सेवन केल्यानं भूक नियंत्रित होते. त्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं. आयुर्वेदानुसार रोज एक कप गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा करुन प्याल्यास शरीरातील फॅटस कमी होवून बारीक होण्यास मदत होते.
Image: Google
3. मुळव्याधीचा त्रास असल्यास गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यानं फायदा होतो. गुलाबाच्या पाकळ्यात फायबर आणि पाणी असतं. हे घटक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. रोज 5 ते 7 गुलाबाच्या पाकळ्या खाल्यास मुळव्याधीच्या समस्येत रक्त येणं, आग होणं हे त्रास कमी होतात.
4. निरोगी त्वचेसाठी अ, क आणि ई ही जीवनसत्वं महत्वाची असतात. ही जीवनसत्वं गुलाबाच्या पाकळ्यात असतात. चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या, डाग असल्यास गुलाबाच्या पाकळ्या खाव्यात.