Join us  

एका दिवसात किती तूप खावं? आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगतात, तूप खाण्याची योग्य पद्धत-पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 3:17 PM

Right Way to Consume Ghee : तेलापेक्षा तुपाचे सेवन अधिक पौष्टीक मानले जाते. (Best Way to Consume Ghee)

तुपाचा (Desi Butter) वापर भारतीय  घरांमध्ये अनेक वर्षांपासून केला जात आहे.  जगभरातील सर्वात जुनी चिकित्स पद्धत  आयुर्वेदात तूपाला औषध मानलं गेलं आहे. चरक संहितेनुसार तूप व्यक्तीच्या जीवनात सर्वात जास्त शक्ती वाढवणारं आहे. सात्विक असल्यामुळे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध निरोगी ठेवण्यासही मदत करते. तेलापेक्षा तुपाचे सेवन अधिक पौष्टीक मानले जाते. (Best Way to Consume Ghee) काहीजणांना तूपाचा वास जराही सहन होत नाही तर अनेकजण वजन वाढण्याच्या भितीने तुपाकडे दुर्लक्ष करतात.

सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी नियमित तूपाचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. लोक लठ्ठपणाच्या भितीने तूप खाणं टाळतात. पण तूप खाण्याचे फायदे तोटे समजून घेऊन तूपाची निवड करायला हवी. दिवसाला किती तूप खावं हे समजून घ्यायला हवं. एक्सपर्ट्स याबाबत काय म्हणतात समजून घेऊ.

दातांवर पिवळा थर-आत कीड लागली? १ चिमूट हळदीत 'हा' पदार्थ मिसळून दातांना लावा, पांढरेशुभ्र होतील दात

तुपाचे सेवन योग्य प्रमाणात करावे

ऋजुता दिवेकर यांनी  आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये योग्य प्रमाणात तुपाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. तूप नेहमीच खाण्याच्या टाईपसनुसार असावं. योग्य प्रमाणात तूप खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे चव आणि ओरिजिनल टेस्ट टिकून राहते.  'घी द फॅट बर्नर' या पुस्तकात ऋजुता दिवेकर यांनी काही प्रश्नाचे उत्तर देताना  लिहिले की प्रत्येक दिवशी व्यक्तीने ३ ते ६ चमचे तूपाचे सेवन करायला हवे. 

तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती

एक्सपर्ट्स सांगतात की तूप खाण्याची योग्य पद्धत ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर टाईममध्ये असते. एक किंवा २ चमचे मिसळून तुम्ही खाऊ शकता. ज्यामुळे  शरीरात तूपातील पोषक तत्व टिकून राहण्यास मदत होते. तूप नेहमी गरम पदार्थांसोबत खायला हवं. तुम्ही  गरम चपाती किंवा भाजीवर घालून तूप खाऊ शकता किंवा गरम पाण्यात मिक्स करून पिऊ शकता. या पद्धतीने सेवन केल्यास घी तुमच्या घशाला चिकटत नाही आणि व्यवस्थित डायजेस्ट होते.

आयुर्वेदानुसार सकाळच्यावेळी किंवा रिकाम्यापोटी तूप खाणं उत्तम ठरतं असं नाही. तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी तुपाचे सेवन करू सकता किंवा जेवणाच्या आधी 1 चमचा तूप तोंडात ठेवा त्यानंतर जेवण करा. यामुळे पित्त दोष संतुलित राहतो. पचन अग्नी सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यअन्न