Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

Chapati For Weight Loss : जेवणात बदल करून शरीर निरोगी ठेवणं सहज सोपं आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 09:47 PM2024-07-29T21:47:42+5:302024-07-31T16:08:27+5:30

Chapati For Weight Loss : जेवणात बदल करून शरीर निरोगी ठेवणं सहज सोपं आहे

Chapati For Weight Loss You Can Reduce Belly Fat By Eating Chapati | वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

वजन घटवण्यासाठी चपाती का सोडता? पाहा चपाती खाण्याची योग्य पद्धत-वजन भरभर घटेल

वरण, भात, चपाती भाजी हे पदार्थ भारतीय घरांमध्ये सर्वाधिक खाल्ले जातात.  यात कॅलरीज आणि कार्ब्सचे प्रमाण जास्त असते. आजकाल बऱ्याच लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या असते. वजन वाढू नये यासठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. पण रोजच्या जेवणात काही बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू  शकता. गव्हाच्या चपातीत थोडा बदल करून तुम्ही फायबर्सयुक्त बनवू शकता. जेवणात बदल करून शरीर निरोगी ठेवणं सहज सोपं आहे. (Chapati For Weight Loos You Can Reduce Belly Fat By Eating Chapati)

फायबर्स वजन कमी करण्यास महत्वाची भूमिका निभावतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. सतत काहीही खाण्याची इच्छा होत  नाही. चपातीत फायबर्सचे प्रमाण वाढवण्याासठी तुम्ही  गव्हाच्या पीठात इतर धान्यांचा समावेश करू शकता. जसं की बाजरी, नाचणी या पिठांचा समावेश करा. पण जास्त बारीक दळू नका अन्यथा त्याचा पुरेपूर फायदा मिळणार नाही. मल्टिग्रेन फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहील. चपाती करताना तुम्ही त्यात गाजर, मुळा, फुलकोबी हे पदार्थ घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला भरपूर पोषण मिळेल.

चपातीच्या कॅलरीज कशा कमी कराव्यात

चपातीच्या कॅलरीज कमी करण्यासाठी शक्यतो साधी चपाती खाण्याचा प्रयत्न करा. तूप, तेल न  लावता चपाती खा. यात कमीत कमी कॅलरीज असतात त्याऐवजी प्लेन चपाती खा. मल्टीग्रेन पिठांचा आहारात समावेश करून तुम्ही कॅलरीज कमी करू शकता. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. जर तम्ही ओव्हरवेट असाल  नाचणी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खा.

यात कमीत कमी कॅलरीज असतात आणि पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. याशिवाय नियमित व्यायाम, कार्डिओ एक्टिव्हीज करायला विसरू नका. वजन जास्त वाढू नये यासाठी दोन जेवणांच्या मध्ये कमीत कमी २ ते ३ तासांचे अंतर ठेवा. जास्त खाण्याची इच्छा  झाल्यास तेलकट पदार्थ, पॅकेज्ड फूड खाणं टाळा. 

Web Title: Chapati For Weight Loss You Can Reduce Belly Fat By Eating Chapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.