Join us  

चपाती की भात-वजन घटवण्यासाठी काय कमी खायचं? पाहा पोटभर खाऊन स्लिम राहण्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 8:38 AM

Chapati Or Rice Which Food Is Best For Weight Loss : आठवड्याभरात चार दिवस चपाती, भाकरी आणि २ दिवस भात खायला हवा.

चपाती आणि भात खाणं संतुलित आहाराचा एक भाग आहेत. भात किंवा चपाती खाल्ल्याने बराचवेळ पोट भरल्यासारखं वाटतं. भात खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. वजन कमी होण्यासही मदत होते. (Fitness Tips) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर भात  खायचा की चपाती असं कन्फ्यूजन तुमच्याही मनात असू शकते. (Roti or Rice What To eat For Weight Loss

डायटिशिन्सच्यामते भात आणि चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये वेगवेगळी पोषण मुल्य असतात. वजन कमी करण्यासाठी हे दोन्ही पदार्थ फायदेशीर ठरतात.  आठवड्याभरात चार दिवस चपाती, भाकरी आणि २ दिवस भात खायला हवा. या पद्धतीने  खाल्ल्यास तुम्हाला अन्नातून वेगवेगळी पोषण मूल्य मिळतील. म्हणूनच रोजच्या आहारात चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांचा समावेश करायला हवा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपाशी पोटी राहू नका. (Chapati Or Rice Which Food Is Best For Weight Loss)

वजन  कमी करण्यासाठी भात खावा की चपाती?

हेल्थ एक्पर्टसच्या मते वजन कमी करण्यासाठी ज्वारी, बाजरीची भाकरी चपाती तुलनेत उत्तम ठरते.  गव्हाच्या चपातीच्या तुलनेत या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे इंसुलिन लेव्हल वेगाने वाढत नाही. यात फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. भाकऱ्या तब्येतीसाठी फार पौष्टीक असतात. 

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांनी आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.  व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईस खाणं अधिकच फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही भात किंवा चपाती या दोन्हींपैकी कोणत्याही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. 

भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतच नाही? रोज भात खाल्ल्याने शरीरात होतात ४ बदल

चपाती खाताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असते. चपातीत ग्लुटेन जास्त प्रमाणात असते तांदूळात नसते. डायबिटीसच्या रुग्णांनी तांदूळाच्या भाकरीऐवजी चपातीचा आहारात समावेश करावा. कारण  वजन कमी न झाल्यास ब्लड शुगर लेव्हल बिघडण्याचा धोका असतो आणि यामुळे समस्या वाढू शकते. तुम्ही भात कसा आणि किती प्रमाणात खाता हे सुद्धा महत्वाचे असते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात खा किंवा आठवड्यातून २ ते ३ वेळाच भात खा. पांढरा भात न खाता ब्राऊन राईस खा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य