Join us  

प्रोटीन हवंय बदाम परवडत नाही? 'या' ५ डाळी खा, साइड इफेक्ट्सही होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 1:06 PM

Cheapest Protein Source : ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला प्रोटीन्सयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

प्रोटीन शरीराच्या चांगल्या कार्यासाठी महत्वाचा असलेला एक घटक आहे. प्रोटीन्स कमतरतेमुळे शरीर कमकुवत आणि अशक्त होऊ शकते. शरीराचे वजन प्रति किलोग्रामच्या हिशोबाने ०.८ ग्राम प्रोटीनची आवश्यकता  असते. (Cheapest Protein Source) तुम्हाला या प्रमाणात प्रोटीन मिळत नसेल तर तुम्ही कमकुवत आणि अशक्त होऊ शकता. ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला प्रोटीन्सयुक्त खाद्यपदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.  शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही कडधान्य किंवा मूगाचा आहारात समावेश करू शकता. (Add These 5 Types Of Pulses That  Have More Protein Than Almond)

युरोपियन फूड इन्फॉर्मेशन काऊंसिलच्या रिपोर्टनुसार डाळींमध्ये जवळपास २१ ते २५ टक्के प्रोटीन असते. सोया, चवळी, चणे, बीन्स यांत मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात.  डाळी प्रोटीन, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सचा एक उत्तम स्त्रोत आहेत. न्युट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांनी प्रोटीनयुक्त डाळी आणि त्यांच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे, याशिवाय डाळी शिजवण्याच्या पद्धतींबाबतही सांगितले आहे. 

1)  मूग डाळ

१०० ग्राम मूगाच्या डाळीत जवळपास २४ ग्राम प्रोटीन असते. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी याशिवाय आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे असतात. मूगाची डाळ पचायला हलकी असते, डिटॉक्स डाएटमध्ये  मूग डाळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2) मसूर डाळ

मसूराच्या डाळीत जवळपास २२ ग्राम प्रोटीन असते. यात फॉलेट, फायबर्स, आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. याशिवाय  कमी फॅट्स आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. मसूर डाळीच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. हृदयाचे आरोग्य सुधारते याशिवाय मांसपेशींचे निर्माण आहे दुरूस्तीसाठी मदत होते. 

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

3) तुरीची डाळ

तुरीच्या डाळीत जवळपास २२ ग्राम प्रोटीन असते. यात फॉलिक एसिड, फायबर्स यांसारखे अमिनो एसिड्स असतात. कार्बोहायड्रेट्स आणि डाएटरी फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे.  तुरीच्या डाळीच्या सेवनाने शरीराला बरेच आरोग्यदायी फायदे मिळतात आणि पचनक्रिया चांगली राहते. 

खाणं कमी तरी पोट सुटत चाललंय? रोज न चुकता किचनमधले ४ पदार्थ खा, भराभर घटेल वजन

4) चण्याची डाळ

चण्याच्या डाळीत जवळपास २० ग्राम प्रोटीन असते. फायबर, व्हिटामीन सी, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही पोषक तत्व यात असतात. चण्याच्या डाळीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास त्रास होतो. कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास आणि वजन घटवण्यास मदत होते. 

5) उडीदाची डाळ

उडीदाच्या डाळीत जवळपास २५ ग्राम प्रोटीन असते. आयर्न, फॉलेट, फायबर्स, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते. ज्यामुळे हाडं मजबूत राहतात, उर्जा वाढते त्वचा आणि केसांचे आरोग्यही चांगले राहते. 

कोण म्हणतं चपातीने वजन वाढतं? गव्हाऐवजी या ३ प्रकारच्या पौष्टीक चपात्या, झरझर घटेल चरबी

डाळ शिजवण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way To Cook Dal)

डाळ  शिजवण्याच्या काही तास आधी पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे डाळ लवकर शिजेल आणि पचायलाही सोपी असेल. भिजवलेली डाळ ताज्या पाण्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्या. शिजवण्याची वेळ ही प्रत्येक डाळीनुसार वेगवेगळी असते. तुम्ही वरणाला आपल्या आवडीनुसार मीठ, हळद आणि इतर मसाल्यांची फोडणी देऊ शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य