Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

Diet of Virat Kohli During World Cup 2023: हाय प्रोटिन्स आणि लो कार्ब डाएट घेण्यासाठी बघा क्रिकेटर विराट कोहली नेमका कोणता आणि कसा आहार घेतोय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 12:20 PM2023-10-30T12:20:04+5:302023-10-30T12:21:26+5:30

Diet of Virat Kohli During World Cup 2023: हाय प्रोटिन्स आणि लो कार्ब डाएट घेण्यासाठी बघा क्रिकेटर विराट कोहली नेमका कोणता आणि कसा आहार घेतोय....

Chef revealed about Virat Kohli's high protein low carb food, Diet of Virat Kohli during World Cup 2023 | शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

Highlightsयापुर्वीच्या दोन विश्वचषक स्पर्धांदरम्यान तो त्याच्या आहाराबाबत एवढा सतर्क कधीच नव्हता. पण यावेळी मात्र आहार आणि वजन नियंत्रणात ठेवणे, या दोन गोष्टींवर त्याचा भर आहे. 

वर्ल्ड कपचे सामने मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. यादरम्यान ॲक्टीव्ह राहण्यासाठी आणि प्रत्येक सामन्यात आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी भारतासकट सगळ्याच खेळाडूंचं लक्ष त्यांच्या डाएटवर आणि व्यायामावर आहे (Diet of Virat Kohli During World Cup 2023). त्यामुळे हे सगळेच खेळाडू खूप मोजून मापून आणि डाएटिशियनने दिलेल्या सल्ल्यानुसारच आहार घेतात. आता स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या हाय प्रोटीन्स आणि लो कार्ब या डाएटसाठी नेमका कसा आहार घेतो, याविषयीची माहिती भारतीय टीम ज्या हॉटेलमध्ये राहते आहे, तिथले प्रमुख शेफ अंशुमन बाली यांनी टाईम्स ऑफ इंडिया यांना दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शेअर केली आहे. (Chef revealed about Virat Kohli's high protein low carb food)

 

विराट कोहलीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही वेगन डाएट फॉलो करते. तिच्यामुळेच विराटनेही त्याची आहारशैली बदलली आणि तो ही आता वेगन झाला आहे. त्यामुळे त्याची रोजची प्रोटिन्सची गरज भागविण्यासाठी तो आता टोफू आणि सोया या दोन पदार्थांचं सेवन जास्तीतजास्त प्रमाणात करत आहे.

आईस फेशियल! त्वचा तरुण ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त उपाय- पण करताना मात्र 'ही' गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर.....

हे दोन पदार्थांचा भरपूर वापर करूनच त्याच्यासाठी वेगवेगळ्या डिशेस केल्या जातात. त्यामध्ये भाज्या, मॉक मीट, मोमोज असे पदार्थ असतात. विराट कोहली तिसऱ्यांना विश्वचषक स्पर्धेत खेळतो आहे. यापुर्वीच्या दोन विश्वचषक स्पर्धांदरम्यान तो त्याच्या आहाराबाबत एवढा सतर्क कधीच नव्हता. पण यावेळी मात्र आहार आणि वजन नियंत्रणात ठेवणे, या दोन गोष्टींवर त्याचा भर आहे. 

 

इतर भारतीय खेळाडूंच्या आहाराबाबत शेफनी सांगितलं की ते रागी डोसा, मिलेट डोसा, मिलेट इडली, वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे यासोबतच काही मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर देत आहेत.

१० मिनिटांत करा क्रिस्पी- क्रंची पनीर कुरकुरे... कुणाल कपूर यांची खास रेसिपी- एकदा खाऊन बघाच

या सगळ्या पदार्थांपैकी रागी डोसा म्हणजेच नाचणीचा डोसा हा बहुतांश खेळाडूंचा आवडता पदार्थ आहे. 

 

Web Title: Chef revealed about Virat Kohli's high protein low carb food, Diet of Virat Kohli during World Cup 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.