Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा..

सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा..

Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss? : चिया आणि सब्जा बियांमधला फरक समजून घ्या, वेट लॉससाठी काय योग्य पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 02:59 PM2024-08-02T14:59:32+5:302024-08-02T15:04:31+5:30

Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss? : चिया आणि सब्जा बियांमधला फरक समजून घ्या, वेट लॉससाठी काय योग्य पाहा..

Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss? | सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा..

सब्जा की चिया सीड्स? सुटलेलं पोट कमी करण्यासाठी काय खावं? दोन्हींमधला फरक पाहा..

उत्तम आरोग्यासाठी डाएट आणि व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे (Weight Loss). मुख्य म्हणजे आहार महत्वाचा असतो. कारण आपण काय खातो, यावर आपले आरोग्य सुदृढ राहील की नाही, हे कळून येते (Fitness). डाएटमध्ये बरेच जण विविध गोष्टी खातात. ज्यात चिया किंवा सब्जा सीड्सचा देखील समावेश आहे.

असं म्हटलं जातं चिया किंवा सब्जा या दोन्ही सीड्स वेट लॉससाठी मदत करतात (Sabja/Chia Seeds). दोन्ही बिया दिसायला सारखेच दिसतात. ज्यामुळे बऱ्याचदा दोघांमधला फरक लवकर कळून येत नाही. वेट लॉससाठी नेमकं कोणते बिया उपयुक्त ठरतील हे जाणून घेण्यासाठी आधी या दोघांमधील फरक जाणून घेऊयात(Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss?).

चिया सीड्स खाण्याचे फायदे

चिया सीड्समध्ये कॅलरीजचे प्रमाण फार कमी असते. शिवाय ते ग्लूटेन-मुक्त असतात. वेट लॉससाठी आपण चिया सीड्स पुडिंग, स्मूदी किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता. चिया बियांमध्ये ६ टक्के पाणी, ४६ टक्के कार्ब्स, ३४ टक्के फॅट्स आणि १९ टक्के प्रोटीन असते.

मासिक पाळीत पोट दुखते-पायात गोळे येतात? ३ गोष्टी टाळा, क्रॅम्प होतील चटकन कमी

याशिवाय यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात. जे शरीराला फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून सरंक्षण करतात. चिया बियांमध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे  पोट दिर्घकाळ भरलेले राहते, आणि प्रोटीनमुळे भूक कमी लागते.

सब्जा बियांमध्ये आढळणारे पोषक घटक

सब्जा सीड्समध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. १३ ग्रॅम सब्जाच्या बियांमध्ये २ ग्रॅम प्रोटीन, ७ ग्रॅम कार्बोहायड्रेट, २. ५ ग्रॅम फॅट्स आणि १२४० मिलीग्रॅम ओमेगा -३ असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन देखील असते. ज्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वेट लॉससाठी मदत होते.

चिया आणि सब्जामधील फरक

चिया सीड्स काळ्या रंगाचे नसून, राखाडी, तपकिरी, पांढरे किंवा काळ्या रंगाचे असतात. शिवाय आकाराने थोडे मोठे असतात. तर सब्जा बिया लहान, गोलाकार आणि काळ्या रंगाच्या असतात.

मधुमेह होऊ नये म्हणून काय करावं? ३ गंभीर चुका वेळीच टाळा; अन्यथा वजन वाढेल आणि..

वेट लॉससाठी चिया सीड्स खावे की सब्जा

चिया आणि सब्जाच्या बियांमध्ये जवळपास समान पोषक तत्वे आढळतात. ज्याचा आरोग्याला फायदाच होतो. याने भूक कमी होते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या बिया आपण खाऊ शकता.

Web Title: Chia and Sabja seeds: Which one is better for Weight Loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.