Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > महिलांच्या आरोग्यासाठी चिया सीड्सचा सुपर डोस! चिया सीड्स खाण्याचे 7 फायदे

महिलांच्या आरोग्यासाठी चिया सीड्सचा सुपर डोस! चिया सीड्स खाण्याचे 7 फायदे

केसांपासून हाडांपर्यंतचं आरोग्य जपण्यासाठी महिलांनी चिया सीडस (chia seeds for health) खायलाच हवेत. छोट्याशा बियांमध्ये लपलंय महिलांच्या निरोगी (chia seeds benefits for women health) आरोग्याचं गुपित. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 04:28 PM2022-06-30T16:28:31+5:302022-06-30T16:47:37+5:30

केसांपासून हाडांपर्यंतचं आरोग्य जपण्यासाठी महिलांनी चिया सीडस (chia seeds for health) खायलाच हवेत. छोट्याशा बियांमध्ये लपलंय महिलांच्या निरोगी (chia seeds benefits for women health) आरोग्याचं गुपित. 

Chia Seeds Super Power for Women's Health .. 7 Benefits of Consuming chia seeds | महिलांच्या आरोग्यासाठी चिया सीड्सचा सुपर डोस! चिया सीड्स खाण्याचे 7 फायदे

महिलांच्या आरोग्यासाठी चिया सीड्सचा सुपर डोस! चिया सीड्स खाण्याचे 7 फायदे

Highlightsवजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांच्या डाएटमध्ये चिया सीड्स अवश्य असायला हवेत. मेनोपाॅजनंतर हाडांचं आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी चिया सीड्सचं सेवन फायदेशीर ठरतं. चिया सीड्सच्या नियमित सेवनानं त्वचा आणि केसांचं आरोग्य  जपलं जातं. 

सर्वच प्रकारच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण महिलांच्या आरोग्याचा विचार करता चिया सीड्स (chia seeds) जास्त फायदेशीर असतात. पोषण तज्ज्ञ मेघा मुखीजा यांनी महिलांनी आहरात चिया सीड्सचा समावेश का करायला हवा याबाबत सविस्तर माहिती तर दिली आहेच शिवाय चिया सीड्सचा एक पौष्टिक पदार्थ देखील सांगितला आहे. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड  भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात फायबर, प्रथिनं, जीवनसत्वं, खनिजंही असतात. चिया सीड्समधील (chia seeds benefits) पोषक घटकांमुळे महिलांच्या आरोग्यास (chia seeds for women health)  अनेक फायदे होतात.

Image: Google

चिया सीड्स महत्वाचे आहेत कारण...

1. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर असतं. महिलांमध्ये प्रामुख्यानं ओमेगा 3 या घटकाची कमतरता आढळते. ओमेगा 3 या घटकाची महिलांच्या शरीराला जास्त गरज असते. ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड शरीरावरची सूज कमी करण्यास आणि ह्दयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर असतं. 

2. सूज आणि दाहविरोधी गुणधर्मामुळे चिया सीड्स हदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. चिया सीड्समधील फायबर  आणि ओमेगा 3 मुळे ट्राइग्लिसराइड्स हा रक्तातील घटक अर्थात बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. 

3. वजन कमी करण्यासाठी आहारात चिया सीड्स अवश्य असायला हवेत. चिया सीड्समध्ये प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर असतात. यामुळे आतड्यातील चांगल्या जिवाणुंची वाढ होते. वजन कमी होण्यासाठी आतड्यांचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. चिया सीड्स आतड्यांचं आरोग्य राखण्यास मदत करतात. 

4. मेनोपाॅजनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या हाडांच्या तक्रारी सुरु होतात. मेनोपाॅजनंतर हाडं मजबूत राखण्यासाठी चिया सीड्स महत्वाचे असतात. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस या घटकांचं प्रमाण अधिक असतं.  हे सर्व घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. चिया सीड्समधील सूजविरोधी घटक संधिवाताची समस्या रोखण्यास मदत करतात. 

Image: Google

5. चिया सीड्समध्ये अल्फा लिनोलेइक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. या ॲसिडचा उपयोग स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी होतो. 

6. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास चिया सीड्समधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड उपयुक्त असतं. रक्तप्रवाह चांगला असल्यास त्वचेचा कोरडेपणा, सूज या समस्या दूर होतात. मॅनचेस्टर येथील एका अभ्यासानुसार ओमेगा 3 मुळे त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण होतं.  चिया सीड्समधील गुणधर्मांमुळे त्वचा सैल पडत नाही. 

7. चिया सीडसमध्ये फॅट, फायबर आणि ॲण्टिऑक्सिडण्टस हे घटक असतात. हे घटक इन्शुलिन आणि चयापचय विकारात महत्वाचे असतात. या घटकांमुळेच हार्मोन्सचं संतुलन टिकून राहातंं आणि पीसीओएस ही समस्या असल्यास त्याची तीव्रता चिया सीड्समुळे कमी होते. पीसीओएसचा धोका टाळायचा असल्यास आहारात चिया सीड्सचा समावेश करायला हवा असं मेघा मुखीजा म्हणतात. 

Image: Google

चिया सीड्सचं पौष्टिक पुडिंग

चिया सीड्सचं पौष्टिक पुडिंग करण्यासाठी 300 मिली दूध, 1-2 चमचे चिया सीड्स, 1 केळं, आंबा, 1 चमचचाम्ध, 2 चमचे सुका मेवा घ्यावा.  एक मोठ्या भांड्यात दूध, चिया सीड्स आणि मध एकत्र फेटून घ्यावं. ते रात्रभर तसंच झाकून फ्रिजमध्ये ठेवावं.  दुसऱ्या दिवशी दूध आणि चिया सीड्सच्या घट्टसर मिश्रणात बारीक कापलेला सुकामेवा, केळ, आंबा ही फळं कापून घालावीत. हे चिया सीड्सचं पुडिंग आरोग्यासाठी पौष्टिक असतं. 

Web Title: Chia Seeds Super Power for Women's Health .. 7 Benefits of Consuming chia seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.