Join us  

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे साधे-स्वस्त ५ पदार्थ; जीवघेणे आजार होणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 1:13 PM

Cholesterol Control Tips : गरमीच्या दिवसात ताजी फळं जसं की कलिंगड, लिंबू, काकडी, भेंडी, आंबा, संत्री आणि इतर फळांचे सेवन केल्यास हृदयाचे आजार टळण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसात लोक गोड थंड पेयांचे अधिकाधिक सेवन करतात. आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्ससारखे इतर साखरयुक्त पेयांचे अतिसेवन केल्यानं कोलेस्टेरॉल वाढते. (Cholesterol Control Tips) कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय इतर जीवघेणे आजारही उद्भवतात.  पोषणतज्ज्ञ  शिखा अग्रवाल यांच्यामते गरमीच्या दिवसात ताजी फळं जसं की कलिंगड, लिंबू, काकडी, भेंडी, आंबा, संत्री आणि इतर फळांचे सेवन केल्यास हृदयाचे आजार टळण्यास मदत होते. याशिवाय खराब कोलेस्टेरॉलही कमी होते. म्हणूनच आहारात फळं आणि भाज्यांचे सेवन वाढवायला हवे. (Tips to Cut Your Cholesterol Fast)

भेंडी

उन्हाळ्याच्या दिवसात भेंडीचे  सेवन शरीरासाठी उत्तम मानले जाते. यात व्हिटामीन, के, सी आणि ए तसंच मॅग्नेशियम फॉलेट, फायबर्ससारखी पोषक तत्व अससतात. यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये पेक्टिन नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे एलडीएल कमी करण्यास मदत होते. 

कलिंगड

कलिंगडात अनेक पोषक घटक असतात.  कोल्डड्रिंक्स ऐवजी एक ग्लास टरबूजाचा रस पिणे हा उत्तम उपाय आहे. टरबूजमध्ये लाइकोपीन असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

पोटावरची एक्स्ट्रा चरबी भरभर घटेल; फक्त रोजचा नाश्ता अन् जेवणाचं बेस्ट टायमिंग लक्षात ठेवा

काकडी

काकडी हा उन्हाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवते. त्यात फायटोस्टेरॉल असतात जे उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

परवल

परवल ही अशी स्वादिष्ट भाजी आहे जी सर्वांना खायला आवडते. ही भाजी उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करते. व्हिटॅमिन सी, बी1, बी2 आणि ए सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, परवल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. हे वजन कमी करण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येशी लढण्यास देखील मदत करते.

उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रिजमधलं गार पाणी पिता? वेळीच ही सवय बदला, नाहीतर.....

कारलं

कारलं अनेकांना खायला अजिबात आवडत नाही पण यात बरीच पोषक तत्व असतात. एंटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. यात व्हिटामीन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स