वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण शहाळाच पाणी आवडीने पितात. नारळाच्या पाण्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. वजन कमी करण्यासाठी नारळाचे पाणी खूप चांगले मानले जाते कारण त्यात कॅलरीज खूप कमी असतात. नारळाचे पाणी प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे आपण अतिरिक्त कॅलरीज असलेले अन्नपदार्थ खात नाही. इतकेच नाही तर नारळाचे पाणी रोज प्यायल्याने चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म वाढण्यासही मदत होते. आपल्या शरीराचा मेटाबॉलिज्म रेट जितका जास्त असतो, तेवढ्या वेगाने फॅट बर्न करण्यास मदत होते. त्यामुळे वजनही कमी होते(Coconut water with Sabja Seeds).
आजच्या अनियमित आणि बिझी लाईफ स्टाइलमुळे लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्याचबरोबर ऑफिसमध्ये तासनतास बसणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे देखील वजन वाढण्याचे कारण आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आरोग्यदायी सवयींची सवय लावावी लागेल. विशेषत: आपण सकाळी कोणत्या प्रकारचे रुटीन फॉलो करता? सकाळच्या नाश्त्यामध्ये काय घेता ? या सगळ्याचा आपल्या वजनावर परिणाम होतो. वजन कमी करण्यासाठी आपण नारळ पाणी तर पितोच. पण हे नारळ पाणी पिताना त्याची योग्य पद्धत त्याचबरोबर नारळ पाण्यासोबत एक सिक्रेट पदार्थ खाल्ला तर वजन लगेच कमी होण्यास मदत होते. दिल्ली विद्यापीठातून न्यूट्रिशनमध्ये मास्टर्स केलेल्या आहारतज्ज्ञ मनप्रीत सांगतात, नारळाचे पाणी पिऊन वजन नेमके कसे कमी करावे(Coconut Water With Sabja Seeds For Weight Loss).
वजन कमी करण्यासाठी नारळ पाण्यासोबत नेमके काय घ्यावे ?
आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी वजन कमी करण्यासाठी नारळ पाण्यासोबत सब्जाचे बी (How to use sabja seeds for weight loss) खाण्याचा सल्ला दिला आहे. वजन कमी करणे आणि रि-हायड्रेशन (Re-Hydration) यांसाठी नारळ पाणी हे सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. ज्यांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, अशा व्यक्तींनी दररोज न चुकता नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे पोट बराचकाळ भरल्यासारखे वाटू लागते. यामुळे आपण इतर अरबट - चरबट पदार्थ खाणे टाळतो. अशा प्रकारे, वजन नियंत्रणात ठेवता येते. नारळ पाण्यामध्ये कॅलरी कमी प्रमाणामध्ये असतात. परिणामी बायो-एक्टिव एंजाइम्स डायजेस्ट करायला मदत होते. नारळ पाणी प्यायल्याने मेटाबाॅलिज्म बूस्ट होते, त्यामुळे वजन कमी करायला मदत होते.
वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...
कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...
नारळ पाण्यासोबत सब्जाचे बी का खावे ?
१. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी हे अधिक फायदेशीर आहे.
२. सब्जाच्या बिया नारळ पाण्यांत मिसळून प्यायल्यास लठ्ठपणा लवकर कमी होतो.
३. यामुळे शरीराला हायड्रेशन तर मिळतेच पण इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
४. सब्जाच्या बिया आणि नारळाच्या पाण्याचे हे मिश्रण एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही.
भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...
वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...
५. सब्जाच्या बियांमध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि यामुळेच आपण गरजेपेक्षा जास्त खाणे टाळतो.
६. सब्जाचे बी आणि नारळ पाणी दोन्ही गोष्टी शरीरातील उष्णता कमी करतात.
७. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि वाढलेले कोलेस्ट्रॉलही योग्य मर्यादेत राहते.
८. सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा - ३ फॅटी अॅसिड भरपूर असते आणि ते फॅट बर्न करण्यासाठी चांगले मानले जाते.
कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच...
पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...
नारळ पाण्यासोबत सब्जाचे बी घेण्याची योग्य पद्धत कोणती ?
एक ग्लास नारळ पाण्यांत आपण एक टेबलस्पून सब्जाचे बी घालू शकतो. किंवा सब्जाचे बी खाऊन त्यानंतर त्यावर देखील आपण नारळ पाणी पिऊ शकता.